चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला पहिल्या महिला ठाणेदार!
चंद्रपूर, ४ मार्च २०२४: एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर, नागपूर येथून बदलीवर आलेल्या प्रभावती एकलूरे यांना शहर पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांनी पदभार स्वीकारला. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला ठाणेदार मिळाल्या आहेत.
यासोबतच, जिल्ह्यातील दुर्गापूर आणि पाथरी पोलीस स्टेशनमध्येही महिला ठाणेदार कार्यरत आहेत. जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशन महिलांनी कमान सांभाळणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
पोलीस स्टेशनला महिला ठाणेदार मिळाल्याने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





