Home Local news चंद्रपूरचे क्रिकेट सटोरी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी कडे ‼️

चंद्रपूरचे क्रिकेट सटोरी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी कडे ‼️

573

चंद्रपूर चे क्रिकेट सटोरी गडचिरोली जिल्ह्या च्या अहेरी कडे ‼️

शोम.. शोम.. शामो.. शाचा सारखी सटोऱ्याची अवस्था

चंद्रपूरातील नामवंत बुकी ने हाथ उचलले?

चंद्रपूर – जिल्ह्यातील क्रिकेट बुकी ची पोलीस अधीक्षक यांनी परेड घेताच. शहरातील नामवंत बुकी नी आपल्या ID बंद करीत अल्पसा वीराम घेतल्याचे बोलल्या जात आहे. मात्र शहरातील क्रिकेट सट्टेबाजानी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणी आलापल्ली क्षेत्रात धाव घेत तेथील क्रिकेट बुकी पकडल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. अहेरी तालुक्यात जवळपास 7-8 मोठे बुकिं असल्याचे बोलल्या जातं आहे. दोन वर्षा अगोदर अहेरी येथील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी आलापल्ली येथूनच पहिली क्रिकेट बुकी वर कारवाई करीत तब्बल 53 क्रिकेट बुकी ला गजाआड केले होते. मात्र त्यानंतर थंड बस्त्यात बसलेले अहेरी पोलीस यांना विसर पडल्याचा भास होत आहे. अहेरी येथे मोठ्या प्रमाणात क्रिकेट वर सट्टा लावल्या जातं असल्याचे एका क्रिकेट बुकी ने सांगितले आहे. सध्या अहेरी हा क्रिकेट बुकी चा गड मानल्या जातं आहे. लवकरच या संधर्भात डेली पोस्टमार्टम नावाचा शोध घेऊन ते अहेरी त लें बुकी कोन याचा नावा सहित उलगडा करणार आहे. आणी या बुक्यांना कोणाचे अभयदान याची वाच्यता करणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.