Home Breaking News राज्य सरकारी – निम सरकारी कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप...

राज्य सरकारी – निम सरकारी कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू..

11
Oplus_131072

गडचिरोली/ एटापल्ली :- राज्य सरकारी निमसरकारी- कर्मचारी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा आज दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप सुरू करण्यात आला असून संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्याची पूर्तता शासन स्तरावर पूर्ण करण्यात यावे याकरीता राज्य सरकारी- कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र बृहन्मुंबई राज्य सरकारी आंदोलन संघटनेकडून करण्यात येत आहे.

संघटनेच्या महत्वाच्या प्रलंबीत मागण्या __
सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसुचना तत्काळ जारी करावी.

कंत्राटी व रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे.

सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत.

सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी शासन स्तरावर दोन महिन्यांतून एकदा चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे.

विभागीय सेवा प्रवेश नियम आणि आकृतीबंधास विनाविलंब मान्यता द्यावी.

लिपिक संवर्गातील एक स्तर कमी करुन कार्यात्मक पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात.

बृहन्मुंबईतील सर्व कर्मचाऱ्यांना मंत्रालयीन लिपिकांप्रमाणे दरमहा रु.५०००/-ठोक भत्ता मिळावा.

सर्व कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक, कंत्राटी कर्मचारी यांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी स्वास्थ्य विमा योजना लागू करावी.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहनचालक आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी.

सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे.

मित्रहो, आपल्या अस्तित्वाच्या लढाईस सज्ज रहा !
२१ एप्रिल पासूनचा बेमुदत संप संपूर्णतः यशस्वी करा असे आवाहन संघटनेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केले आहे.

यावेळी आंदोलनात सहभागी कर्मचारी विजय करपते, जयंत डोंगरे, रमेश सुपट्वार, शितल खोब्रागडे, बाबुरावजी वनकर, अभिलेख मेश्राम, भगवान बन्सोड, सुरेंद्र ठाकूर, मुन्नाभाऊ खोब्रागडे, उज्वला सरकार, रविंद्र अत्राम, जगदिश सिडाम, सुनिल दुधबावरे, यशवंत दुर्गे, पराग खोब्रागडे, गणेश गेडाम, पुसू पुंगाटी, प्रवीण चौधरी, आशा निशाद, विनोद भाड़सोडकर, शैलेन्द्र चाखारे इत्यादी व संघटनेचे कर्मचारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.