Home Local news शहरं महानगर पालिकेची अवस्था केम चो मजामा छो….

शहरं महानगर पालिकेची अवस्था केम चो मजामा छो….

221

 

 

सुशांत घाटे

चंद्रपूर – चंद्रपूर मनपाच्या कार्यकाळाला 5 वर्ष संपत आल्याने वर्ष 2022 ला सार्वत्रिक निवडणूका लागणार असल्याने नवा गडी नवा डाव असे चेहरे आतापासून शहरात वावरताना दिसत आहे.

मात्र सत्ताधारी भाजपच्या गोटात गुटबाजीने प्रवेश केल्याने या महिन्यात होणारी स्थायी समिती निवडणुकीत वाद उफळण्याची शक्यता आहे.
भाजपचे एकनिष्ठ असलेले नगरसेवक व गटनेते वसंता देशमुख हे स्थायी सभापती पदी वर्णी लागावी यासाठी अनेक वर्षांपासून तयार बसले आहे मात्र भाजपमधील एक गट त्यांना या पदाजवळ फिरकू देत नाही आहे.
मात्र सत्ताधारी व विरोधकांच्या मध्ये सामान्य नागरिक गुंफला जात आहे, साडेचार वर्षाच्या कार्यकाळात चंद्रपूर मनपा वादाच्या भोवऱ्यात नेहमी राहली आहे.
वर्ष 2020 ला कोरोनाची पहिली लाट आली त्या लाटेत मनपा ने डब्बा घोटाळा केला असा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता, नंतर कचरा घोटाळ्यात सुद्धा सत्ताधारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर मनपा ने हद्दचं केली, महापौर यांच्यासाठी घेतलेल्या नव्या चारचाकी वाहनांसाठी अतिविशिष्ट क्रमांकासाठी पालिकेने 70 हजार रुपये मोजले होते.
साडेचार वर्षाच्या कालावधीत चंद्रपूरकराना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पालिकेने दारोदार भटकवले, अमृत योजनेच्या नावाखाली शहरातील संपूर्ण रस्ते खोदून ठेवले मात्र दुरुस्तीच्या नावाखाली फक्त लिपापोती करण्यात आली.
आज शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ते खड्ड्यात गेले आहे, इतकेच नव्हे तर शहरातील मुख्य रस्त्यांचे सुद्धा तेच हाल आहे.
मधल्या काळात स्वच्छता सर्व्हेक्षण मध्ये पालिकेने आपली पाठ थोपटली मात्र त्यानंतर शहरात डेंग्यूचा प्रकोप सुरू झाला, स्वच्छतेच्या बाबतीत स्वतःची पाठ थोपटविणारे डेंग्यू च्या प्रकोपावर गप्प बसले.
सामान्य नागरिकांना विकासाच्या नावावर चंद्रपूर मनपाने खड्ड्यातील धूळ चाखायला लावली हे आता तरी नागरिकांनी विसरू नये.
कोरोना काळात कोरोना प्रादुर्भाव ओसरत असताना कोविड हॉस्पिटल पालिकेने सुरू केले होते मात्र त्यापूर्वी हजारो नागरिकांनी स्वतःचा जीव गमाविला.
वेळ गेल्यावर चंद्रपूर मनपा सक्रिय झाली, आम्ही नागरिकांच्या हितासाठी काम करतो हे मिरविण्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीवर प्रसिद्धी केली.

विरोधक फुस्स….    

चंद्रपूर मनपाने घोटाळा केला हे आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केले मात्र याचा पुरावा त्यांना देता आला नाही.महापौर राखी कंचर्लावार यांनी या सर्व आरोपांचे सडेतोड उत्तर विरोधकांना देत त्यांना तोंडघशी पाडले.महापौर यांनी विरोधकांना खडसावत आरोप करत आहात तर त्याचे पुरावे सादर करा अन्यथा असले तथ्यहीन आरोप करू नका.

 

 

 

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.