वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड चंद्रपूर क्षेत्रीय हॉस्पिटल मध्ये डॉ. रेणुकादेवी यांच्या निष्काळजीपणामुळे मोहम्मद अन्सारी या रुग्णाचा मूत्यू

140

चंद्रपूर: 6 सप्टेंबर ( सुनील तायडे )
वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड चंद्रपूर क्षेत्रीय हॉस्पिटल मध्ये फक्त डॉ. रेणुकादेवी यांच्या निष्काळजीपणामुळे 33 वर्षीय कामगार मोहम्मद अन्सारी या रुग्णाचा मूत्यू झाला. मोहम्मद अन्सारी या रुग्णाला उपचारासाठी चंद्रपूर येथील वेकोली रुग्णालयात भरती केले होते.  डॉक्टर रेणुका देवी यांनी वेळेवर रेफर दिले नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी विनंती करून रेफर मागितले परंतु डॉ.रेणुका देवी यांनी अत्यंत उर्मटपणे नातेवाईकांना रुग्ण व्यवस्थित असून रेफर करण्याची गरज नाही असे सागितले. रुग्ण रेफर करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नातेवाईकांनी चंद्रपूर क्षेत्राचे एरिया वेलफेअर मेंबर सेजूदिन शेख, सुदामा यादव, घनश्याम यादव, शरद धांडे यांना मोहम्मद अन्सारी गंभीर असून देखील योग्य उपचार होत नसल्याची तक्रार केली. कामगार नेत्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना संघटनेमार्फत विनंती केली परंतु वैद्यकीय अधिकारी रेणुका देवी व मुख्य चिकित्सा अधिकारी ज्योती चंद्रागडे यांनी तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी मोहम्मद अंसारी गंभीर झाल्यावर रेफर करण्यात आले. अधिकारांनासुद्धा रेफर साठी आग्रह केला. परंतु, डॉ. रेणुका देवी मुख्य चिकित्सा अधिकारी ज्योती चंद्रागडे यांनी दुर्लक्ष करत दुसऱ्या दिवशी रेफर केलं. वेळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाची काळजी घेतली असती तर मोहम्मद अंसारी या कामगाराचा मृत्यू झाला नसता. मुख्य चिकित्सा अधिकारी चंद्रागडे यांच्या हिटलर शाही कार्यशैलिवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील अनेक दिवसापासून चंद्रपूर क्षेत्रीय हॉस्पिटल मध्ये रुग्णांची होणारी हेळसांड व रुग्णांची योग्य काळजी न घेणे, व्यवस्थित औषधोपचार न करणे असे अनेक वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारे आरोप कामगार संघटनांनी वरिष्ठांकडे केल्यावरही त्याची दखल घेतल्या जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी रेणुका देवी रुग्णांचा उपचार तर सोडाच तर अत्यंत उर्मटपणे व मग्रुरीने वागतात याची देखील तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. मुख्य चिकित्सा अधिकारी चंद्रागडे यांनी तक्रारीवर दुर्लक्ष केल्याने अशा प्रकारच्या घटना चंद्रपूर क्षेत्रीय हॉस्पिटलमध्ये घडतात. या रुग्णाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेकोलि प्रशासनाने दंडित करावे अन्यथा कोळसा कामगारांचे शोषण सुरूच राहणार अशी खंत काही कामगार नेत्यांनी व्यक्त केली.

सुनील तायडे.                                      संपादक