Home Breaking News पागल बाबानगर येथे मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या कामगार वस्तीत सिलेंडर...

पागल बाबानगर येथे मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या कामगार वस्तीत सिलेंडर स्फोट झाल्यामुळे आग लागली.

147

चंद्रपूर :५ सप्तेंबर ( सुनील तायड़े )          बल्लारपूर बायपास मार्गावरील पागल बाबानगर येथे मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या कामगार वस्तीत सिलेंडर स्फोट झाल्यामुळे आग लागली. ही घटना आज ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे, अग्निशमन विभागाचे अधिकारी श्री. चैतन्य चोरे यांच्यासह अग्निशमन कर्मचारी दाखल झाले. आग विझविण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत.

सुनील तायडे

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.