124

चंद्रपूर: 4 ऑक्टोबर ( सुनील तायडे )

शेततळयात पती पत्नी चा बुडुन दुर्दैवी मृत्यु
मांडवा येथील घटना.

शेतातून घरी परत येत असताना शेततळयावर बंडीसह बैलांना पाणी पाजत असताना बंडीवर बसलेले पती पत्नी या दोघांचा बुडुन मृत्यु झाला. ही घटना आज दुपारी दोन वाजता च्या दरम्यान घडली.                                                          .                  प्राप्त माहिती नुसार अनिल डाहुले (40),व पत्नी छाया अनिल डाहुले (35) हे दोघेही बैलबंडी ने शेतात गेले होते परतीच्या वाटेवर असताना रस्त्यातच एक सार्वजनिक शेत तळे आहे. या तळ्यावर बैलांना तहान लागल्याचे पाहुन अनिल ने बैलबंडी सह बंडी पाण्यात टाकली. बैलाने खोल पाण्यात ओढत नेल्याने बंडी वर बसलेले अनिल व छाया पाण्यात बुडाले. बंडीवरून सुटून दोन्ही बैल पोहत बाहेर आले. ही घटना गाववाल्याना कळली व घटनास्थळी धाव घेतली परंतु तेव्हा पर्यंत दोघेही बुडाले होते. या घटनेची माहिती भ्रमणध्वनी वरुन कोरपना पोलीसांना तात्काळ दिली माहीती मिळताच घटनास्थळी कोरपना पोलीस पोहचले दोघांचे प्रेत पाण्या बाहेर काढून कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणले होते वृत्त लीहे पर्यंत शवविच्छेदन व्हायचे होते. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत. मृतकाला एक मुलगा चौदा वर्षाचा असुन आई वडील पाण्यात बुडुन मरण पावल्याने पोरका झाला आहे.

सुनील तायडे                                        संपादक                                    ९४२२१४००४५