Home Breaking News आर्थिक फसवणुक करणाऱ्या युवा सेना (उबाठा) जिल्हाध्यक्षावर कारवाई करावी ! ऍड. मिनार...

आर्थिक फसवणुक करणाऱ्या युवा सेना (उबाठा) जिल्हाध्यक्षावर कारवाई करावी ! ऍड. मिनार खोब्रागडे यांची पत्रकार परीषदेत मागणी

121

गडचिरोली – सेकंड हॅन्ड स्कार्पिओ गाडी खरेदी करून देतो असे सांगुन २५ हजार रूपये घेतल्यानंतरही गाडी खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून आपली आर्थिक फसवणुक करणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष पवन राघो गेडाम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ऍड. मिनार खोब्रागडे यांनी आज ३ जून रोजी

स्थानीक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत केली.

ऍड. खोब्रागडे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले की, दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेना (उबाठा) युवासेना जिल्हाध्यक्ष पवन राघो गेडाम यांनी आपणास, मी तुला एक सेकंडहंड स्कोर्पिओ गाडी खरेदी करून देतो, परंतु त्यासाठी पूर्वी बुकिंग करावी

लागेल आणि त्यासाठी बुकिंग रक्कम म्हणून २५००० द्यावे लागतील व उर्वरित रक्कम गाडीची डिलिव्हरी झाल्यानंतर द्यावे लागतील असे सांगितले. त्यांनी सांगितल्यानुसार योगिता पवन गेडाम यांच्या फोन पे नंबर ८४८४९०९५४८ या नंबरवर १९ ऑक्टोबर २०२४ रोजी २५००० रूपये पाठविले.

त्यानंतर पवन गेडाम यांनी गाडी देण्यास टाळाटाळ केली. आपण पोलीस ठाण्यात तक्रार करूनही न्याय मिळाला नसल्याचे ऍड. खोब्रागडे यांनी सांगितले.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.