Home Breaking News गोंडपिपरी चे तहसीलदार, ठाणेदार यांची कुलथा रेती घाटावर संयुक्त कारवाई!

गोंडपिपरी चे तहसीलदार, ठाणेदार यांची कुलथा रेती घाटावर संयुक्त कारवाई!

279

Action in revenue and police department
चंद्रपूर15 जून – सुशांत घाटे
गोंडपिपरी तालुक्यातील “कुलथा” रेती घाट चा शिल्लक रेती साठाच नसताना आणखी टी. पी. कशी या संधर्भात वृत्त प्रकाशीत होताच महसूल आणि पोलीस प्रशासन खळबळुन जागे झाले असल्याचे काल पहायला मिळाले?

गोंडपिपरी चे तहसीलदार स्वतः आणि त्यांचे पथक आणि गोंडपिपरी ठाणेदार यांनी 14 जून ला रात्री 10:30 च्या सुमारास कुलथा रेती घाटावार पोहचत संयुक्त कारवाई केली असता त्या ठिकाणी कुठलाही रेती चा शिल्लक साठा आढळूनच आला नाही?

उलट त्या ठिकाणी रॅम बनवून पोकलेन मशीन नदीपत्रात टाकून असल्याचे निदर्शनास येताच तहसीलदार यांनी सक्तीचे निर्देश देत मशीन काढण्याचे आदेश देताच रेती घाट धारकांना चांगलाच दम दिला?

तहसीलदार गोंडपिपरी यांनी घाट धारकांना दिलेला तो परवाना रद्द करण्यात येत असल्याचा अहवाल तैयार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेतीसाठा शिल्लक नसताना नदीपात्रातून अवैध उत्तखंनं करणाऱ्या चंद्रपूर च्या त्या रेती व्यवसायिकानाची यावेळी चांगलीच फजिती झाल्याचे पहायला मिळाले!

पोलिसांनीही या ठिकाणी चोख बंदोबस्त लावत या रेती घाटावार कुठलीही अवैध उत्तखंनं होऊ नये या करीता गोंडपिपरी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी कडक पोलिसांचा पहारा या ठिकाणी लावला आहे. महसूल आणि पोलिसांची या संयुक्त कारवाईने रेती तसकरांचे चांगलेच धाबे सध्यातरी दनानांले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.