तीस लाखाच्या मोबदल्यात चंद्रपुरात पोस्टिंग? कोल्हापुरी पॅटर्न ने केली होती ग्रँड चैन! “शाह”साहेबांचे फोन येत होते म्हणे.. लबाड अटकला ACB च्या हाथी..

1219

चंद्रपूर 27 मे (सुशांत घाटे )- राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार म्हणजे, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या विशिष्ट यंत्रनेचा एक मोठा भाग असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे.
या रॅकेट मध्ये चंद्रपूर – नागपूर आणि थेट मुंबई पर्यंत चॉईस पोस्टिंग ची तीस लाख रुपयाच्या मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चंद्रपुरात वर्णी लागली आहे?

चंद्रपूर जिल्ह्यातून दारू व्यवसायातून अवैध हफ्त्या वसुलीचा आखडा पाहून कोल्हापूर, पुणे येथून थेट अधिकारी चैन बनवत चंद्रपुरात गेल्या सहा वर्षांपासून तळ ठोकून कोट्यावधीची अवैध वसुली करीत, चल – अचल संपत्ती बनवत चंद्रपूरातील जिल्ह्यातील दारुव्यावसायाकांना “वाकोल्या” दाखवत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुगीचे दिवस आलेच होते मनावे लागेल, महिन्याला लाखो रुपयाची वसुली आणि तोडी करत अधिकारी बेभान होत जिल्ह्यात राऊंड वन, राऊंड टू आणि थ्री करत हिस्सेदारीत वाटल्या गेले होते.

त्या वेळेस च्या सध्या सेवानिवृत्त पाटील साहेबानं या ठिकाणी बरेच प्रलय घडवत आणि पवार च्या साथीने जिल्ह्यात हूडगुंद माजवला होता.

मात्र जिल्ह्यातील जशी दारू बंदी हटली खास करून पाटील ला आपल्या पाटील ला आनण्यात मोठाच रस होता. कारण इथली कोट्यावधीची ची मालकी मुळात कोल्हापूर पॅटर्न ला हवी होती? आणि मग काय डाव आणि पैशाचा खेळ करत पाटील कंपनी ने आपली युक्ती लावत आपल्या मोहऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यात पदभार देण्याकरीता राज्यातील ( त्या वेळेस च्या )मंत्र्याच्या दालनात शिक्कामोथर्ब करीत चॉईस पोस्टिंग विथ नेम इन चंद्रपूर साठी सूटकेस देत आपली बकेट सुटकेस घेत चंद्रपूर चा ताबा घेतला.

मग काय चार कोल्हापुरी, एक पुणे यांनी जिल्ह्यात देशी – विदेशी, वाईन शॉपी, बिअर बार बोट दाखवा तेथे आणि लक्ष्मी ची प्रदीक्षणा घाला करीत सर्रास लायसन्स चा वाटप करीत चंद्रपूर जिल्ह्याला “मद्द्यपूर “जिल्हा च करून टाकला.

बंगाली कॅम्प परिसरात तर चक्क वाणिज्य वापरातील दुकान दाखवून महानगर पालिका चा कुठलाच अहवाल न घेता कवेलू दुकानाला च वाईन शॉप ची परमिशन देऊन तर धमाल च करून टाकली? भद्रावती येथील शिंदे नामक व्यक्ती ने या ठिकाणी वाईन शॉपी थाटली मात्र ज्या दुकानात कॉलम च नाही त्याची तपासणी सुद्धा अधिकाऱ्यांना करता आली नाही?

मुळशी पॅटर्न प्रमाणे कोल्हापुरी पॅटर्न चालवत अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडत करोडो रुपयाची भ्रष्टाचाराच्या मार्गातून कमाई सरस केली आहे.

पवार,क्षीरसागर यांची ही जिल्ह्यात दारूबंदी उठण्यापासून ते जिल्ह्यात जो पर्यंत कार्यकाळ होता त्याचीही चौकशी करणे तितकेच गरजेचे आहे?
पा
टील नंतर पाटील आणि कोल्हापूर पॅटर्न ला सरळ” शाह ” चे फोन येत होते म्हणे.. कोल्हा लबाड ही गोष्ट ऐकली होती आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयाची लाच घेताना अटक करीत ती खरी करून दाखवली.

जिल्ह्यात आधी मला – मला हवे करत कित्येक जन या ठिकाणी पोस्टिंग साठी टपून बसले होते. मात्र अँटी करप्शन च्या 440 वोल्ट झटक्याने पार घामाचिक्कर होत येथूनच अभिनंदन बदली च्या तयारीत अर्ज करीत लागला आहे.

थोरात, लिचडे हे पडद्या मागचे मुख्य कलाकार आहे. थोरात ला ही काही समजेनासे झाले आहे. महिन्या चे कशे करत ब्रम्हपुरी पर्यंत फेरफटका मारत द्या द्या करीत फर्मान करीत आहे तर लिचडे लिज्जत पापड खात आपली पोळी शेखत आहे.

पोलीस खात्यातील दोन पोलीस इन्स्पेक्टर ना ही राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सोडले नाही? त्यांच्याकडूनही त्यांनी वसुली केली आहे. मूल मार्गा वर स्थित चिंचपल्ली नदीच्या बाजूला असलेल्या बार ला ही परवाना देण्या करीता एक्ससाईझ च्या त्या अधिकाऱ्याने,लक्ष्मी घेतच फाईलीवर ठसा दिला. हिम्मत इतकी वाढून गेली होती की काही दिसेनासे यांच्या नजरेत झाले होते!

लक्ष्मी चा प्रसाद द्या आणि काम करून घ्या हा फार्मुलाच पाटील च्या कार्यकाळत अस्थीवात आला होता. मग काय जर प्रसन्न नाही तर “फाईल” हरवली करीत धूळ खात पडून राहायची दीड वर्षांपासून बियर शॉपी ची कागदपत्रे बनवून कार्यालयच्या खटाटोप ठोकणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांचा पारा च चढला? आणि कोल्हापुरी पॅटर्न मित्रा सोबत घुट घेत असताना फोन वरच अलगद लटकला……. आता चंद्रपूर नको म्हणून सुर गवसणाऱ्या अधिकाऱ्यांना चंद्रपूरातुन केलेली भरगच्च कमाई चा SIT समोर तर सामना करावंच लागेल?
पावसाळी अधिवेशनात यांची चांगलीच पोलखोल होणार आहे. पूर्व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं, तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, या सोबत वर्तमान जिल्हाधिकारी यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची विश्वासनीय माहिती आहे.