चंद्रपूर 10 मे ( सुशांत घाटे )-
राज्यात खळबळ माजवून देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या,चंद्रपूर अधीक्षक संजय पाटील सहित दोन कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या,एक लाख रुपयाच्या लाचे प्रकरणी अडकले असताना मुख्य आरोपी असलेले सूत्रधार संजय जयसिंग पाटील हे अद्याप फरार,असताना ते अटकेत न आल्याने दबावतंत्रा चा वापर करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त सूत्रांनी दिले आहे.
यातील आरोपी क्रमांक दोन आणि तीन हे सध्या अँटी करप्शन विभागाच्या PCR मध्ये असताना,मुख्य आरोपी अजूनही न मिळाल्याने,जन सामान्य नागरिकांत भ्रष्टाचार नी पोखरलेल्या या अधिकाऱ्यांना आणखी PCR घेऊन मुख्य आरोपी असलेल्या अधीक्षक संजय पाटील यांना अटक करण्याची मागणी सामान्य जनतेतून होऊ लागली आहे? चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने, इतका मोठा ट्रॅप केला असताना अधीक्षक पाटील अद्याप काय गवसले गेले नाही, हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे? दबाव तंत्र नी तर चे,ACB च्या अधिकाऱ्यांवर दडपण तर नाही ना,हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे?
कुठे आहे अधीक्षक पाटील? दबावतंत्र निर्माण करीत आहे का?
कोट्यवधीची माया जमवत बस्तान बनवणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या, चंद्रपूर अधीक्षक संजय जयसिंग पाटील यांच्या वर कारवाई न व्हावी या साठी राजकीय, आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याना साकडे घालत,जोरदार फील्डिंग लावण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रा नी दिली आहे?
भ्रष्टाचारात कोट्यवधीची माया जमवाणाऱ्या या अधिकाऱ्यांची पाठराखण करणारा राज्यातील तो प्रमुख अधिकारी दबाव तंत्र या कारवाईत वापरत असल्याचे गोपनीय माहिती डेली पोस्ट मार्टम ला हाथी आली आहे?
या भ्रष्टखोर अधिकाऱ्याने अटकेबाहेर असल्याने सध्या आपले चक्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायथ्याशी गुरु दक्षिणा देत घातल्याचे विश्वसनीय वृत्त आहे?
मात्र जो पर्यंत मुख्य आरोपी हा अटकेत येणार नाही तो पर्यंत या वरून पडदा उठणार नाही त्यामुळे न्यायालयाने अटकेत असलेल्या,आरोपीचा PCR वाढवल्यास आणखी मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे?
त्यामुळे जनसामान्य नागरिकां कडून अशा भ्रष्टखोर अधिकाऱ्यांची पोलीस कोठडी वाढवावी जेणेकरून मुख्य आरोपी ला शोधता येईल ही मागणी जोर धरू लागली आहे?