Home Breaking News हवा हवाई.. दुबई, गोवा..चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट बूकी ‼️

हवा हवाई.. दुबई, गोवा..चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट बूकी ‼️

425

चंद्रपूर (4एप्रिल)-आय पी एल हंगाम सुरु होताच चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट बूकी हवा- हवाई झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कारवाईचा कडक इशारा देताच जिल्ह्यातील क्रिकेट बूकी दुबई आणि गोव्याला हवा हवाई करत आपले बस्थान घेऊन पोहचले आहे. जिल्ह्यात क्रिकेट बूकी ची नायनाट करण्याचा आदेश देताच पोलीस विभाग बूकी वर कारवाई करीता फास आवरत असताना,क्रिकेट बूकी सुरक्षित आवारात आपले साम्राज्य घेऊन त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट सटोरीयांचा व्यवसाय थाटून बसले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांना बूकी दुबई आणि गोव्यातून वाकोल्या दाखवत?
आपला क्रिकेट बुक चा व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करीत आहे.
ऑनलाईन अँप च्या माध्यमातून सध्या क्रिकेट विश्वाताला IPL हंगामाला सध्या बूकी नी गोवा आणि दुबई ला प्राधान्य दिले असल्याचे विश्वासनीय सूत्रा द्वारे माहिती मिळाली आहे.
पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने सध्या बूकी हवा हवाई करीत असल्याचे बोलल्या जातं आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.