चंद्रपूर( 30मार्च) – ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कार्य- कर्त्यांची फळी नसनारे स्वयंभु राजकारणी नेता वर्ग,
आपल्यावर अन्याय झाला, असे म्हणत,स्वतः ची पोळी कशी शेकली जाईल याचा विचार करत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात, बेडूक उड्या मारत खटाटोप करत असल्याचे दिसत आहे?काँग्रेस च्या एका कद्दावर नेत्याचा आश्रय घेत आता पर्यंत या बहिरूपी राजकारणी नेत्याने चांगलीच राजकारणाच्या आड संधी साधून पांढरे शुभ्र कपडे घालून प्रकाशमय दिव्यात आपले भवितव्य तारले?
मात्र निवडणुकीत आपल्याला आर्थिक विकास कसा लाभेल याचा विकसित आराखडा
राबवण्याच्या दृष्टीने स्वतः च्या वैयक्तिक फायद्यासाठी समाजाच्या एका घटकेतील त्या नेत्या ला एक कार्यकर्ता पण जुळेना असे झाले आहे?
स्वतःच जाऊन त्या नेत्याने पक्ष प्रवेश घेऊन आपण समाचाचे मत आपल्या ला भक्कम पाठिंबा देऊन निवडून आणू म्हणणाऱ्या या नेत्याला सध्या आमदारकीचे डोहाळे लागले आहे?
अशाच एका समाजातील शिक्षणसम्राट नेत्याला एका पक्षाने काही दिवसा अगोदर लोकसभा तिकीट देतो? पक्षात प्रवेश करा करत त्याला स्वप्न दाखवत? या शिक्षण सम्राटाने लाखो रुपये उडवत आपले कौशल्य दाखवले? मात्र आता परिस्थिती ना घर का ना घाट का अशी अवस्था त्या नेत्यांची झाली आहे?
राष्ट्रीय पातळीवर समाजाच्या बॅनर वर चालणारा तो नेता आता साध्या कागदावर पण दिसत नाही?असल्याची खमंग चर्चा सध्या रंगू लागली आहे?
अशाच परिस्थिती मध्ये या एका नेत्याला आर्थिक आणि राजकीय पोळी शेकण्याचा डाव लोभीस आला..”देवा मला पाव “करीत आपला.. धीर या नेत्याने सोडला आहे. प्रकाश झोतात येणारा “बिन पेंदय्याचा लोटा “व्यावसायिक दृष्टीने जरी प्रगत असला तरी मात्र कार्यकर्त्यांची फळी नसणारा हा स्वयंभु नेता आहे.रंग बदलू गिरगिट नेता समाजाचा आरसा होण्याचा प्रयत्नात सध्या त्या उमेदवाराच्या नजरेत प्रयत्न चालवत आहे? मात्र शिक्याला शाही नाही आणि ठप्पा मारायला हा नेता सध्या बेडूक उड्या मारत आहे.