है तैयार हम… क्रिकेट बूकी चा नारा ‼️

908

चंद्रपूर -गडचिरोली *22मार्च*(सुशांत घाटे )
IPL च्या 17 व्या हंगामाला आज पासून प्रारंभ होत असून आज प्रथम लढत गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळरू भिडतील.
देश – विदेशात ही IPL च्या ह्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात करोडो,खरबो, रुपयाचा क्रिकेट सट्टा ऑनलाईन क्रिकेट ID आणि बुकिंच्या विशेष फोन वर लावण्यात येतो. या ऑनलाईन सट्ट्यात आतापर्यंत कीती तरी तरुण, व्यावसायिक क्रिकेट जुगाराच्या व्यसनाने कर्ज बाजारी तसेच आत्महत्या च्या उंबरथाट्यावर गेले आहे?
मालामाल झालेले बुकी साठी हा जणू मोठा फेस्टिवलच असतो. इकडे क्रिकेट फंटर ही ह्याची जणू IPL ची आतुरतेने वाटच पाहत असतो,या वर्षी तरी IPL मध्ये कार, बंगला करोडो रुपये कमावणार याचे भान लावून ठेवतो मात्र त्याच्या पदरी शेवट पर्यंत निराशा च पडत असते?
चंद्रपूरात आणि गडचिरोली जिल्ह्यातही याचा मोठया प्रमाणात क्रिकेट ऑनलाईन ID वर खेळ खेळ्ल्या जातो?
करोडो रुपयाचा सट्टा या IPL विश्व विक्रम बेतात आखला जातो. ऑनलाईन ID मध्ये मोठया प्रमाणात फ्राड (धोखेबाजी)पण केल्या जाते याचे कितीतरी उदाहरणं पहाव्यास मिळाले आहे.
………….. करोडपती फंटर झाला रोडपती?
गेल्या 10वर्षा पासून कधीही न हारणारा चंद्रपूर तुकूम येथील क्रिकेट बेटिंग चा बादशाह समजला जात होता? क्रिकेट बूकी पण त्याचे सौदे घ्याला थर थर घाबरत होते?त्याचा इतका दरारा होता की त्याला जिल्ह्यातील क्रिकेट फंटर नी गॉड च बनवले होते, साधारण काम करणारा युवक अचानक झपट्याने करोडपती झाला, घर, शेती, दुकानें, फार्म हाऊस, सोने नाण्याने त्याची ऐशो आराम जिंदगी उदय्यास आली मात्र, जसा ज्या कासवगतीने चालत त्यांनी इतके एम्पायर उभे केले ते अगदी “ताश के पत्तो के माफिक ढह गये “..म्हणजे त्याला या क्रिकेट बेटिंग मध्ये हरायला एक महिना सुद्धा नाही लागला करोडो रुपयाची कमवलेले मालमत्ता सर्व त्याची ऑनलाईन क्रिकेट ID मध्ये राख करून गेली? त्याला ऑनलाईन क्रिकेट ची ID भेटताच त्याला वीस दिवसात च चंद्रपूर – नागपूर च्या बूकी नी करोडो रुपयाची प्रॉपर्टी विकण्यास मजबूर करत साफ करून टाकले?
करोडपती फंटर हा सध्या रोडपती फॅक्टर वर येऊन बसला आहे?
…….*क्रिकेट* बूकी चे जाळे तालुक्यापासून ते गावा गावा पर्यंत….
IPS मुम्मका सुदर्शन चंद्रपूर जिल्ह्यात रुजू होताच त्यांनी क्रिकेट बूकी ची परेड घेत वीराम ठोकण्यास सांगितला होता. त्यांना प्रतिसाद देत त्या बूकी नी आपला क्रिकेट धंदा बंद ही केला होता. मात्र यांचा धंदा बंद होताच पावसाळ्यात जसे बेडूक बाहेर येऊन कॅक, कॅक करतात तसें IPL साठी क्रिकेट बूकी बाहेर आले आहे?
शहरातील पडोली, राजुरा, भद्रावती, मूल, गडचांदूर, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, ब्रम्हपुरी या ठिकाणी नवीन बागड बिल्ले बूकी आपले बाशिंग बांधून आज सकाळ पासून IPL च्या क्रिकेट बेटिंग साठी सज्ज झाले आहे?
राजुरा येथे जवळपास 6बूकी कार्यरत आहे, पडोली येथे 2, गडचांदूर येथे 3, भद्रावती येथे 4, मूल येथे 2, सिंदेवाही येथे 2, चिमूर येथे 3,वरोरा 3,सध्या तालुका ते गावा गावाच्या टोका पर्यंत हे बूकी आपले जाळे पसरवून आहे. ठळक म्हणजे NICE.7777. Com ची चालणारी ID ही नागपूर च्या एका मोठ्या बूकी ची असून त्याने विदर्भात चांगलेच पायामुळे रोवले असून करोडो ची बेअयामी संपत्ती गोळा केली आहे. त्या संपतीला एक नंबर मध्ये करावयासाठी त्याने अनेक उद्योग सध्या उभारून ठेव्हले आहे.
राजुरा तालुक्यातील *स्वप्नील*हा मोठा बूकी असून त्याची विदर्भात मोठी आखनी आहे, राजूऱ्यातील हा बूकी केवळ तीन वर्षात कोट्यावधीच्या क्रिकेट बेटिंग चा व्यवसायात मोठा मासा झाला आहे. त्यासोबत *फैजल*, *झाडे* आणि आणखी तीन बूकी मोठ्या प्रमाणात आपले बुक या ठिकाणी चालवतात…………(पुढील बातमीत प्रकाशित..)
क्रमश :………