ACB च्या ट्रॅप मधून निसट लेला ठाणेदार संदीप एकाडे LCB च्या कारवाई ने गोत्यात ‼️
रेती तस्करी करणारे चार हायवा पकडले?
चंद्रपूर (1मार्च )-अवैध धंद्याना रान मोकळे करून देणाऱ्या कोरपना चे ठाणेदार संदीप एकाडे ला चंद्रपूर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुसरा मोठा जबर धक्का आज पहाटे रेती ची तस्करी करणाऱ्या चार (हायवा)पकडत दिला आहे. आर्थिक व्यवहार करीत पोलीस अधीक्षका च्या आदेशाला न जुमानता आपली भ्रस्टाचारी यंत्रणा राबवणारे आणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध व्यवसायाला चालना देणारे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे सध्या चांगलेच धास्तावले आहे. एका पाटोपाठ LCB ने सलग दोन मोठया कारवाई करत ठाणेदारा चे पोलीस अधीक्षका समोर पितळ उगडे पाडले आहे. ट्रॅफिकीन मधून महिन्या काठी लाखो रुपयाची अवैध वसुलीही याच पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे. ACB च्या
सापळ्यातुन निसट लेल्या मगरूळ ठाणेदारा ला चांगलाच फटका बसल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यातील पोलीस दलात सुरु आहे. लोकांशी हेखेखोर पद्धतीने वागणाऱ्या आणी नियमाला कात्रन लावणाऱ्या ठाणेदार वर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन लवकरच चक्रे फिरवतील. पोलीस अधीक्षक यांचे अवैध धंध्याना बंद करण्याचे आदेश असताना राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या कोरपना पोलीस स्टेशन चा गलिच्छ कारभार मुळे येथील जनता ही संतापलेली आहे.त्यांना ठाणेदार पदावरून काढण्याची मागणी होत आहे?