अखेर घुगुस ला नवे ठाणेदार ‼️श्याम सोनटक्के यांची वर्णी ‼️

483

चंद्रपूर – घुघूस चे नवे ठाणेदार पदी श्याम श्रीराम सोनटक्के यांची वर्णी लागली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून आसिफरजाशेख यांच्या बदली नंतर घुघूस पोलीस स्टेशन चा प्रभार हा सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरे यांच्या कडे होता. काल रात्री पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांनी पोलीस निरीक्षक सोनटक्के याची घुघूस येथे नियुक्ती केली. औद्योगीक नगरी म्हणून घुघूस शहराची ओळख आहे. घुघूस येथील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रमुख आव्हाण नवीन पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या वर आहे.