कोरपना ठाणेदार संदीप एकाडेच्या हद्दीत LCB ची कारवाई ‼️

1059

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या ठाणेदाराला चपराक?

चंद्रपूर – अवैध धंध्याना रान मोकळे करून देणाऱ्या आणी लाखो रुपयाचीअवैध मार्गातून भ्रष्टाचार चे कितीतरी आरोप आणी वादग्रस्त रुपयाची माया कमावणाऱ्या कोरपना पोलीस निरीक्षक संदीप एकाडे च्या हद्दीत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने (क्राईम ब्रांच ) सुगंधित तंभाखु चा साठा पकडला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या ठाणेदाराचे विशिष्ट संबंध अवैध व्यावसायिका सोबत या पूर्वीच उघडकीस आले आहे. मागचे तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशीं यांनी बरेच त्या वेळेस या

अधीकाऱ्याला संरक्षण दिले होते. खोट्या गुन्ह्यात नाव नोंदवून पैशाची लाच मागणाऱ्या या ठाणेदारा वर लाचालूचपत प्रतिबंधक विभागात तक्रार ही नोंदवली गेली होती. मात्र यांच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आल्याने या ठाणेदारांनी तो मी नव्हेच? असा पवित्रा घेत आपले खापर एका पोलीस उपनिरीक्षक का वर फोडले? त्यामध्ये पूर्वीचे पोलीस अधीक्षक यांना भ्रष्टाचार संबंधि प्रकरणाची गुप्त माहिती होताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला बदली करत चंद्रपूर येथे हलवले. स्वतःची बाजू सारवा-सावर करीत लाखो रुपयांची माया या अधिकाऱ्याने जमवल्याची खमंग चर्चा कोरपना तालुक्यात सुरु आहे? LCB ने कारवाई चा सपाटा सुरूच ठेवला असून कोरपन्यात अजूनही आणखी काही व्यावसायिक रात्रौ ला अवैध धंध्याना चालना देत आहे. पोलीस अधीक्षक यांच्या कारवाईने सध्या जिल्हा पिंजून काढणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने कोरपना पोलिसाच्या हद्दीत सुंगधित तंभाखु पकडून चांगलीच चपराक बसवली आहे. कोरपना चे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या संदर्भात वर्तमान पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार हे लवकरच कळेल.