**चंद्रपूर जिल्ह्यात थंडीचा गारवा; सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी**
चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात थंडीचा गारवा निर्माण होऊ लागला आहे. सकाळी अलगद धुक्याने अक्षरशः गारवा निर्माण करत समोरची रस्ता किंवा व्यक्तीही न दिसेल इतके वातावरण अदृश्य झाल्याचे दिसत आहे. सकाळच्या सत्रात सुरु असणाऱ्या शाळा आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या मुलांना शाळेत पाठवण्या करीता चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे पालक वर्गानी सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेचा टाईमिंग 7 च्या ठिकाणी 8 वाजता करावा ही मागणी केली आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना केल्यानंतर, त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. सकाळी अलगद धुक्याने अक्षरशः गारवा निर्माण करत समोर च ही रस्ता किंव्हा व्यक्तीही न दिसेल इतके वातावरण अदृश्य झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढत आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारासही तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. सकाळी अलगद धुक्याने वातावरण अदृश्य झाल्याने वाहतुकीसही अडचणी येत आहेत. सकाळच्या सत्रात सुरु असणाऱ्या शाळा आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या मुलांना शाळेत पाठवण्या करीता पालकांना खूप त्रास होत आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना उशीरा उठावे लागत आहे. तसेच, मुलांना शाळेत पोहोचण्यासाठीही खूप वेळ लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पालक वर्गानी सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेचा टाईमिंग 7 च्या ठिकाणी 8 करावा ही मागणी केली आहे. पालकांच्या मते, सकाळी 7 वाजता मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक आहे. थंडीमुळे मुलांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांचा धोका असतो. त्यामुळे शाळेचा टाईमिंग 8 वाजता केल्यास मुलांना या आजारांपासून बचाव होईल.
सध्या सकाळच्या सत्रातील शाळा सात वाजताच्या आसपास भरत असून, ही वेळ पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल. पालकांची सकाळी पाच बाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत आहे.
आठ तास झोप झाल्यास, त्यांचा मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. बदलत्या जीवनशैलीमुळे रात्री उशिरापर्यंत पालक जागे असल्याने, मुलेही जागतात. अशा वेळी लवकर झोपून, आठ तासांची झोप घेतल्यानंतर सकाळीच शाळेत गेल्यास हरकत नाही. मात्र, पूर्ण झोप न घेता सकाळी सातला शाळेत जाणे हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. पोट साफ न होणे, मेंदूला आराम न मिळणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सकाळी सातऐवजी साडेआठच्या आसपास शाळा सुरू होऊ शकल्यास, मुले वाहतूक कोंडीपूर्वी शाळेत जातील,’ असे मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले.
काही शाळा अगदी सात वाजता भरवल्या जातात. त्यापेक्षा सकाळी आठ किंवा नऊ ही वेळ अधिक योग्य वाटते. पालक उशिरा जेवणारे, टीव्ही बघत लोळणारे असतील, तर मुलेही तेच करतात. पूर्ण कुटुंबाने मुलांच्या दिनक्रमाप्रमाणे बदल करून मुलांची झाप किमान सात तास झाली पाहिजे, याकडे लक्ष द्यायला हवे. मुलांची झोप त्यांच्या शिकण्यात, लक्षात राहण्याबाबत आणि मेंदूच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पालक म्हणून आपण मुलांना चांगले शिक्षण मिळण्याबाबत आग्रही असले पाहिजे. त्याच वेळी त्यांचे आरोग्यही उत्तम राहण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सुदृढ आरोग्यासाठी मुलांची झोप हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शाळा उशिराने सुरू होणार असल्यास, पालक स्वागत करतील.
पालकांच्या या मागणीवर शाळा प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
**शाळा उशिराने सुरू करण्याचे फायदे**
* मुलांची झोप पूर्ण होईल.
* मुलांना सकाळी लवकर उठवण्याची गरज भासणार नाही.
* पालकांची सकाळी पाच बाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल.
* मुले शाळेत जाण्यास उत्सुक होतील.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





