Home Breaking News *पोलीस अधीक्षक यांचा सुंगधित तंबाखू “खर्रयाला … खळ खळ खट्याक!‼️‼️ ...

*पोलीस अधीक्षक यांचा सुंगधित तंबाखू “खर्रयाला … खळ खळ खट्याक!‼️‼️ *पोलिसांनी हेल्मेट, सिटबेल्ट लावणे सक्तीचे? *आधी स्वतःचे घर स्वच्छ करणार मग समोर.. ‼️‼️ *जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा ने अवैध धंद्धयाना केले ग्राउंड झीरो! *को…..”पणा” पोलीस स्टेशन च्या ठाणेदाराला कानपिचक्या टोचल्या ‼️

1173

*चंद्रपूर* (10 मार्च )-
*सुशांत* *घाटे* **
* -जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा शिस्त बद्ध पद्धतीने चालवण्याकरिता, पोलीस अधीक्षक *मुम्मका* *सुदर्शन* यांनी आपल्याच विभागातून, कायद्याला अनुसूरून पोलीस विभागाला नियम पाळा अन्यथा कारवाई ला समोर जा? म्हणत दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट चा शिक्कामोतर्ब लावत,त्या सोबतच चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट असणे अनिर्वाय असल्याचे चे सांगत त्याचेही काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहे.
* जर आपण च कायद्याचे नीट पालन केले, तर जिल्ह्यातील यंत्रणा व्यवस्थित रित्या हाताळू शकतो,त्या करीता त्यांचा हा प्रामाणिक हेतू दिसून येत आहे.काही अपवाद वगळता जिल्ह्यातील पोलीस विभागतील यंत्रणा पोलीस अधीक्षक यांच्या या कार्यप्रणाली ला गंभीर घेत काटेकोरपणे नियमाचे पालन करीत आहे. तूर्तास “स्वतः पहले आपले घर स्वच्छ करायचे “आणी मग दुसरे असा संकल्प पोलीस अधीक्षक यांच्या या भूमिकेतून दिसून येतो. जिल्ह्यातील अवैध धंध्याना, पोलीस अधीक्षक यांनी चांगलेच फटके लावत बिमोड केलेअसल्याचे चित्र दिसत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंभाखू च्या “खऱ्या ” वर खळ.खळ.. खट्याक… करत पोलिसी विभागाने चक्र फिरवले आहे. हजारो च्या संख्येत असणारे,
पान -ठेले सध्या कुलूप बंद अवस्थेत दिसत आहे! चोरून लपून विकणाऱ्या काही सुंगधित तंबाखू च्या खऱ्या वरंही पोलिसांची सध्या करडी नजर आहे.
*पोलीस* खात्यात ही काही कर्मचारी *खऱ्यांचे* शौकीन आहे?पोलीस च कारवाई करत असल्याने, लपून चोरून विकणारे ही यांच्या पासून लांब राहण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वी फक्त सुंगधित तंभाखु तस्करावर कारवाई चा बडगा उभारला जात होता, मात्र आता जमीनी कारवाई ने चित्र च बदलून गेले आहे. त्यामुळे “खर्रा… सध्या जिल्ह्यातून *नामशेष* होण्याच्या मार्गावर दिसत आहे!
छोटया छोटया कारवाई च्या भीतीने पान ठेला चालक घाबरू लागल्याने बंद ठेवण्याचा सूर त्यांनी गवसला आहे.
*शहर* पोलीस स्टेशन, *रामनगर* , *बल्लारपूर* , *घूघूस* , दुर्गापूर, *भद्रावती* , मूल, *गोंडपिपरी* , *ब्रम्हपुरी* , राजुरा, वीरूर, *वरोरा* *,* *गडचांदूर* , जिवती, सिंदेवाही, बाळापूर तळोधी, नागभीड, भिसी, *चिमूर* , सावली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी अवैध धंधे बंद करीत शिस्त बाह्य पद्धतीने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला सर्वोच्च स्थान मानत झीरो ग्राउंड केले आहे. एक पोलीस स्टेशन वगळता बाकी,जिल्ह्यातील बाकी एकदम सुपर *पोलिसिंग* चे उत्तम काम करीत असल्याचे दिसत आहे. ते सुटलेले पोलीस स्टेशन आणी पोलीस निरीक्षक यांना पोलीस अधीक्षक यांनी *रडार* वर घेतल्याने कारवाई चा ससेमीरा दाखवण्याचा प्रयत्न ते करीत आहे, मात्र दुसऱ्याच्या कारवाईला(महसूल )आपण घुसून केल्याचा पोवाडा करीत आहे, मात्र सत्य जनतेला ठाऊक आहे!जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला एकदम संयोजिक, बांधील पद्धतीने विश्वास दर्शक तसेच पारदर्शक रीतीने चालवण्याचा धाडस IPS मुम्मका सुदर्शन करीत आहे.सामान्य जनतेतून त्यांचे कौतुक केल्या जातं आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.