घुघूस च्या ठाणेदारा नी भरला टॉप 20 गुन्हेगारांना सज्जड दम ‼️

397

चंद्रपूर – घुघूस पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी घुघूस येथील टॉप 20 सराईत गुन्हेगारा ना सज्जड दम दिला आहे. आपल्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था यावर कठोर पालन करावे अन्यथा कारवाई चा बडगा उभारण्याचे काम पोलिसां मार्फत करण्यात येईल असे ठासून सांगितले आहे.येथील मागील पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी घुघूस येथील गुन्हेगारी ला रोखण्यात सक्षम पाऊले उचलली त्यांचा दरारा आणी लोकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर राहले. नवीन पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के हे ही याच पॅटर्न नी आल्या आल्या आपली भूमिका बजावत आहे. नागपूर येथे त्यांनी क्राईम ब्रांच ला काम केल्या मुळे गुन्हेगारी जगताशी त्यांची चांगलीच गुन्ह्याचा छडा लावण्यात बारकाई आहे.