जिल्ह्यातील “तात्या विंचू” ला ठेसणार महेश…‼️
“झपाटलेल्या”गुन्हेगारी रोखण्यात LCB चा जितेंद्र लढवैय्या….
SP साहेबांच्या शब्दाला तडा नाही होणार.
LCB 24……..
चंद्रपूर – पोलिसांच्या प्रती नेहमी दोन व्याख्याचा प्रलय येत असतो “हा म्हणजे कसा अधिकारी… ” तो ही बाहेरून कुठून न येता,स्वतःच्या खात्या मधून म्हणजे स्टाफ मधून, अधिकाऱ्यांची बदली दर दोन वर्षांनी तर होतच असते,
नवीन अधिकारी कसा असेल याचे सर्वांनाच कुतूहल असते? कारण अधिकारी वर्ग म्हटलं की त्याला त्याची गरिमा असते, अशातच त्याचा स्वभाव कसा, त्याची वागणूक कशी, त्यांचे कामाप्रती किती अभ्यास यातून गुन्हेगारी विश्वावर कसे नियंत्रण आणतील हा मुळात पडलेला प्रश्न, कर्मचारी वर्गा सोबत पत्रकारांना सुद्धा असतो!
सिने दृष्टीत ही एक महेश कोठारे नामक मराठी कलावंत आणी सध्या दिग्दर्शक म्हणून नावाजलले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी विशेषता बऱ्याच मराठी सिनेमा मध्ये पोलीस अधिकारी यांची भूमिका बजावली आहे. त्यात “झपाटलेला ” सिनेमा मध्ये त्यांनी तात्या विंचू सारख्या कुख्यात गुन्हेगाराचा अंत केला आहे. त्यातून गुन्हेगारी जगताशी कशे लढावे लागते हे आपण नेहमीच सिनेमा च्या माध्यमातून बघत असतो पण आपल्या सिनेमा जगाव्यतिरिक्त,सोडता वास्तविक जीवनात अनेक अशे तात्या विंचू? या समाजाशी जुडल्या गेल्या आहे,त्यांचा बंदोबस्त करणे ही काळाची गरजआहे?चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB )ही महेश नावाचा एक कर्मठ आणी स्वाभिमान जपणारा अधिकारी वास्तव्यास उदयास आला आहे?
50लोकांचा स्टाफ आणी जिल्ह्याची धुरा, कुठेही काही गुन्हेगारी घडलं की त्वरित कमांड घेत ऍक्शन मोड वर राहणारे महेश कोंडावार यांनी नवीन पोलीस अधीक्षक येताच,जोरदार धडाकेबाज कारवाई चा सपाटा लावला आहे! सुरवातीच्या काळात जवाब दारीचे पद मिळाल्या नंतर काही काळ त्यांना जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील यंत्रणा नेमकी काय आहे हे समजायला उशीर झाला? पोलीस स्टेशन आणी वाहतूक विभागातून काम करत असल्याने नवीन जवाबदारीचा त्यांना पहिल्या पोस्टिंग ला म्हणजे क्राईम ला हाथाळायला थोडा वेळ लागला! पण त्यांनी त्यानंतर जिल्ह्यातील सर्व गुन्हे आणी अपराधीक कार्यप्रणालीवर आपला मोठा ठसा उमटवत अनेक तात्या विंचू!ची वाट लावली आहे? पोलीस खात्यात ही अशे काही तात्या विंचू चा ही सध्या महेश शोध घेत आहे?अवैध धंध्याना मुख्यता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या विश्वासात कुठलीही तडजोड न होऊ देत, पारदर्शक जिल्ह्यातील पोलीस विभागातील तात्या विंचूना धडा शिकवण्याचे धाडस महेश कोंडावार यांनी केले आहे.
महेश कोंडावार यांच्या दिमतीला जितेंद्र बोबडे हे प्रमुख त्यांच्या हिमतीला नेहमी सडेतोड उत्तर म्हणजे अपराधीक जगताला कायमस्वरूपी संपवाण्याकरिता अग्रेसर आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रनेत आपले स्रोत निर्माण करीत गुन्ह्याचा छडा लावण्यात यांना मास्टरकी आहे. सुरवातीच्या काळात जरा त्रास झाला म्हात्र चाणक्य नितीने त्यांनी कामामध्ये पारदर्शीकता दाखवत गेल्या दोन वर्षात विशेष कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात LCB टीम ने आपले चांगलेच गुन्हेगारी जगतावर नियंत्रण ठेवत त्याला प्रामाणिक प्रयत्न केला आहे. नव्याने आलेले अनेक अधिकारी सध्या LCB ला रुजू झाले आहे. त्यांच्या कडूनही जिल्ह्याला महेश कोंडावार यांच्या नेतृवात आणखी अनेक “तात्या विंचूना ” धडा शिकवायाचे आहे. विकास गायकवाड, हर्षल ऐकरे, चतारकर, बुरीले हे ही अधिकारी जिल्ह्यात आपले महत्व पूर्ण योगदान देत अनेक गुन्ह्याचा तपास करीत शोध घेत आहे.यांच्या दिमतीला अनेक कर्मचारीही दिवस रात्र एक करत आहे. पोलीस खात्यातील ही “तात्या विंचूना “ओळखून त्यांना चांगलाच धाक देणारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तात्या विंचूना “झपाटलेला “करत सोडेल हे नक्की ‼️