गोंडपिपरी येथील बनावट दारू प्रकरणाचा मुख्य म्होरक्या वर्धा जिल्ह्यातील? आरोपी प्रशांत चंदनखेडे चा मुख्य सहभाग ‼️ अल्लीपूर मधून बनावट देशी दारू चंद्रपूर जिल्हात?

1392

चंद्रपूर – गोंडपिपरी पोलिसांनी पकडलेल्या बनावट देशी दारूचा मुख्य म्होरक्या हा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे असून तो सध्या फरार आहे. प्रशांत चंदनखेडे हा कुख्यात दारू तस्कर असून बनावट देशी दारू ची ही खेप वर्धा जिल्ह्यातून च आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोंडपिपरी पोलीस या आरोपीच्या मुसक्या आवळण्या करीता दोन दिवस आधी च अल्लीपूर येथे जाऊन आली. मात्र दारू तस्कर प्रशांत चंदनखेडे हा फरार झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यातून दारू तस्करी करणाऱ्या ला अभयदान कुणाचे हा महत्वाचा विषय पोलिसांच्या आणी दारू उत्पादन शुल्क विभागाच्या एरणी वर ठाण मांडून बसला आहे?. मूळचा अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे हा दारू तस्करी तला मोठा चेहरा मानला जातो. वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी सुरवातीला कारवाई चा चांगलाच धडाका लावला होता, मात्र आता कारवाई ला कासव गती आल्याचे बोलले जातं आहे. वर्धा जिल्ह्यातून बनावट दारू ची इतक्या मोठया प्रमाणात जर खेप येत असेल तर यावरून दारू तस्कर आणखी किती जिल्ह्यात बनावट दारू चा पुरवठा करीत असेल याचा नेम नाही. क्लीन चिट अँड नो करप्शन साठी नेहमी प्रकाश झोतात राहणारे IPS नूरूल हसन यांना आणखी आपल्या कारवाई चा बडगा उभारावाच लागेल. जेणेकरून लपा छुपा डाव आखणारे दारू तस्कर त्याच्या नजरेत कैद होणार आणी बनावट दारू तस्करीला आळा बसेल.चंद्रपूर जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या आधीच जिल्ह्यातील सुरु असलेली अवैध दारू विक्रीला आणी तस्करीला बेड्या ठोकण्याचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील गडचिरोली सीमेवर दारू तस्करीला गोंडपिपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी जोगापूर गावाजवळ 148देशी दारू चे बनावटी पेट्या पकडल्या या मध्ये एका आरोपीचा गोंडपिपरी पोलिसांनी PCR घेत मुख्य म्होरक्या असणाऱ्या प्रशांत चंदनखेडे चे नाव समोर आले आहे. जिल्ह्यात गोंडपिपरी, बल्लारपूर तसेच स्थानिक गुन्हे शाखा च्या उल्लेखनीय कारवाई सुरु असून जवाबदारी ने जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण आणायचा प्रयत्न करीत आहे.