इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन
चंद्रपूर – शहरातील रामनगर परिसरात असलेल्या इंदिरा गांधी गार्डन स्कूल पूर्व-प्राथमिक वर्गाच्या लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 80 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आकर्षक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला.
कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांत मुलांनी त्यांचे बालपण आणि शाळा दोन्ही मागे सोडले होते. मुलांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना स्टेज सादरीकरणाचा सराव व्हावा यासाठी इंदिरा गांधी गॉर्डन स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नर्सरी, एलकेजी आणि यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी एलकेजीच्या मुलांना ‘बॉलीवूड’ आणि यूकेजीच्या विद्यार्थ्यांना ‘ आपल्या देशाचे नेते’ असे विषय देण्यात आले होते. .
विविध वेशभूषा परिधान करून मुलांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. युकेजीच्या मुलांनी शिवाजी महाराज, झाशीची राणी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या वेशभूषेत प्रस्तुतीकरण दिला. यूकेजीच्या मुलांनी ‘शोले’ मधील धर्मेंद्र आणि बसंती, ‘मुगल-ए-आझम’ मधील अनारकली आणि सलीम, ‘तेजाब’ मधील माधुरी दीक्षित, ‘शहेनशाह’ मधील अमिताभ बच्चन, ‘ज्वेल थीफ’ मधील वैजंती माला सारख्या बॉलीवूड स्टार्सची वेशभूषा परिधान करून लोकांची मने जिंकली
अश्विनी बुरडकर व नूतन पिदुरकर या शिक्षिकांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. शिक्षिका शारदा थेरकर व विद्या माथनकर यांनी संचालन केले. शिक्षिका स्वाती सालवटे यांनी आभार मानले. मुलांना आकर्षक वेशभूषा करून स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी पालकांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नर्सरी, एलकेजी आणि युकेजीच्या सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेतील पारितोषिक वितरण 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात होणार आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





