ताडोबात अखेरच्या दिवशी “छोटी राणी” चे सचिन तेंडुलकर ला झाले दर्शन , पुन्हा येईन !असे म्हणत तेंडुलकर ने घेतला ताडोबा चा निरोप

226

चंद्रपुर – 8 सप्टेंबर ( सुनील तायडे )
अखेरच्या दिवशी “छोटी राणी” चे सचिन तेंडुलकर ला झाले दर्शन , पुन्हा येईन !असे म्हणत तेंडुलकर ने घेतला ताडोबा चा निरोप

ताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सात महिन्यानंतर पुन्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी डॉक्टर अंजलीसह शनिवारी (4 सप्टेंबर 2021) ला दुपारच्या सुमारास ताडोबात दाखल झाले होते. त्यांच्या सोबत कुटुंबातील त्यांची पत्नी डाँक्टर अंजली, व मुलीसह अन्य इतर मित्रांचा समावेश होता. मागील जानेवारी महिन्यामध्ये सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबीयांसमवेत तब्बल चार दिवस ताडोबात मुक्कामी आले होते. यावेळीही 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत चार दिवस बांबू रिसोर्टवर मुक्कामी राहून जानेवारी महिन्यात पुन्हा येईन असे म्हणत आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने ताडोबा चा निरोप घेतला

देशभरातील पर्यटकांना ताडोबा अभयारण्यात वाघांचे हमखास दर्शन होत असल्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळेच ताडोबात व्याघ्र पर्यटनाकरिता राजकीय, सिनेसृष्टी असो वा खेळातील सेलिब्रेटींची हजेरी ताडोबात लागत असते.
शनिवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कुटूंबियासह दुपारच्या सुमारास नागपूर येथून ताडोबात दाखल झाले होते. त्याच्या समवेत कुटूंबातील अन्य तिन मित्रांचा समावेश होता. ताडोबात शनिवार ला दूपारी आगमन झाल्यानंतर चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्ट येथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेतं मदनापूर गेट वरून ताडोबा सफारी करण्यास गेले होते. मात्र त्यांना वाघाचे दर्शन झालेले नव्हते. त्यामूळ सचिन तेंडुलकर ने आपला मार्ग बदलवून रविवारला सकाळी 7 वाजताच्या वेळेतच अलिझंजा गेट वरून सफारी केली होती. या हि वेळेस वाघ दिसून आला नाही. त्यामुळं सचिन तेंडुलकर ने पुन्हा आपला सफारीचा मार्ग बद्दलवून रविवार ला सायंकाळी शिवणी जवळील शिरकडा गेट वरून ताडोबातील बफर झोन क्षेत्रात सफारी करण्यात आली होती. मात्र या गेट वरून वाघाचे दर्शन दुर्मिळच होत असते त्यामुळं या हि वेळेस सचिन तेंडुलकर ला वाघ पाहायला मिळाला नाही. त्यानंतर काल पुन्हा झुनाबाईसाठी मदनापूर गेट वरून सकाळी व सायंकाळी ताडोबाच्या बफर क्षेत्रात कुटूंबियासोबत सफारी करायला गेले होते. मात्र काल पण सकाळी व सायंकाळी सुद्धा वाघाची कोणतीही सायडिंग झालेली नव्हती मात्र काल बिबट, हरीण, दिसून आले. असल्याचे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले. यावेळी सचिन तेंडुलकर सोबत, क्रिकेटर सुब्रतो बॅनर्जी, जगदीश फैजल आपल्या पत्नीसह उपस्थित होते.
तर आज अखेरच्या दिवशी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मदनापूर गेट मधून बफर झोन परिक्षेत्रात सफारीकरिता गेले तेव्हा “छोटी राणी” व “पाटलीन बाई” चे 2 बछडे, 8 रानकुत्रे असे अखेरच्या दिवशी दर्शन झाले असल्याचे मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितले.भारतीय टीम ने टेस्ट जिंकली याबाबद्द आपण काय सांगाल असे पत्रकारांनी वार्तालाप करतांना विचारले असता, त्याविषयी भरपूर आनंद आहे. भारत जिंकतो तेव्हा खूप आनंद होतो. चिमूर ची जनता खूप चांगली आहे. खूप सहकार्य करतात असे पत्रकारांशी मराठमोळ्या भाषेत संवाद करतांना सांगितले. यावेळी मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांनी स्वतः गाडी चालवत 4:30 वाजताच्या दरम्यान नागपूर ला रवाना झाले.
यावेळी चिमूर तालुका प्रेस अशोसीएशन अध्यक्ष चुनीलाल कुडवे, राजकुमार चुनारकर, प्रमोद राऊत, जितेंद्र सहारे, फिरोज पठाण, बालू सातपुते इत्यादी उपस्थित होते.
@@@@@@@@@@@@@@@@@

नागपूर च्या कृतिका ला बॅट वर दिले ऑटोग्राफ*
यावेळी नागपूर येथील कृतिका धनंजय सिंग हि मुलगी बॅट घेऊन मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांना भेटायला आली असता, सचिन तेंडुलकर यांनी बॅट वर कृतिका ला “ऑटोग्राफ”दिला.

सचिन तेंडुलकर सोबत युवराज सिंग चे येणे होते निश्चित.
सचिन तेंडुलकर सोबत युवराज सिंग यांचा सुद्धा ताडोबा सफारी करिता दौरा निश्चित होता. त्यामुळं रिसोर्ट मालकांनी युवराज सिंग करिता सुद्धा एक बेड आरक्षित ठेवले होते. मात्र ताडोबासाठी निघायचे ऐन याच वेळी युवराज सिंग च्या मुलाची प्रकृती खराब झाली त्यामुळं युवराज सिंग ने ताडोबा येण्याचे टाळले. मात्र सचिन तेंडुलकर यांनी सांगितले की, पुन्हा वाघाच्या भेटीला येईन तेव्हा मात्र युवराज सिंग सोबत असणार असल्याची माहिती मिळाली.

जगप्रसिद्ध ताडोबा पाहण्यासाठी देश विदेशातून नागरिक येत असतात. येणाऱ्या ऑक्टोबंर महिन्यात ताडोबात सैफअली खान, करीना कपूर व युवराज सिंग येणार असल्याची माहिती मिळाली.                                                सुनील तायडे                                        संपादक                                  ९४२२१४००४५