निराधार बालकास समजसेवक भूषण फुसे यांचा आधार

164

चंद्रपुर :- १ सप्टेंबर ( सुनील तायड़े )

समाजाचे काही देणे आहे’ या पंक्ति नुसार जगणाऱ्यांची संख्या फार कमी स्वरुपात समाजात बघायला मिळते. परंतू या पंक्ति नुसार वागणारेही समाजात काही व्यक्ति आहेत ज्यांना अपंग, निराधार, गोर गरीब, शोषित पीडित यांचे दुःख बघितले जात नाही ते त्यांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात.

असाच एक निराधार 15 वर्षाचा बालक मागील काही दिवसांपासून चंद्रपुर शहरातल्या अंचलेश्वर बस स्थानकावर राहत आहे, मिळेल ते खाणे, मिळेल ते कपडे लावणे आणी त्या स्थानकावरच झोपणे हेच त्याचे जगणे झाले होते त्यात दुर्दैवाची बाब की त्याला चक्कर येण्याचा आजार, अधुन मधुन त्याला चक्कर येते.
या बालकाची काही जागरूक नागरिकांनी समजसेवेक भूषण फुसे यांना माहिती दिली त्यात त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्या निराधार बालकाला अंचलेश्वर बस स्थानका वर जाऊन भेट दिली त्याची विचारपुस करून त्याला आंघोळ घालून शहरातल्या डॉ बेंदले यांच्या खाजगी रुग्णालयात आजाराची तपासणी करुण औषध घेऊन स्वखर्चाने उपचार केलेत. त्यावर डॉक्टर यांनी सीटी स्कैन करायला सांगितले ते सुद्धा भूषण फुसे करणार आहेत. आणी त्या बालकाला निराधार केंद्रात ठेवण्याचे प्रयत्न ते करीत आहेत.
भूषण फुसे यांच्या या कार्याबद्दल त्या निराधार बालकाने आभार मानले तसेच माझ्या सारख्या असंख्य निराधार असणाऱ्या व्यक्तिना समाजातील जागरूक नागरिकांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
समजसेवेचा वसा घेणारे भूषण फुसे यांनी याआधी दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यास मदत केली आहे तसेच तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी मदत केली आहे व शहरातील बऱ्याच भागातील खड्डे त्यांनी स्वखर्चातून बुजविले.
फुसे यांच्या संवेदनशीलतेमुळे सदर बालकास जगण्याची नवी उमेद मिळाली असून त्यांच्या या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे.

सुनील तायडे                                      संपादक                                    ९४२२१४००४५