एकोणा कोयला खदान विरोधात 24 नव्हेंबर 27 ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून जनआंदोलनचा इशारा
वरोरा तालुक्यातील माजरी क्षेत्रात अंतर्गत असलेल्या वेस्टन वेस्टन कोल लिमिटेड कंपनीतर्फे सन 2015 ला एकोना खुली कोयला खदान च्या विरोधात एकोना,वनोजा ,चरूरखडी, मारडा , या गावातील जमिनी कंपनीने भूसंपादित केल्या होत्या. गाववासियांना विविध आम्हीच दाखवून त्यांच्याकडून जमिनी संपादित झाल्यानंतरही कुठल्याही प्रकारच्या कंपनीने त्यांची भरपाई दिल्या नसल्याने, संबंधित कंपनीच्या त्रासाने त्रासलेल्या गावकऱ्यांनी 24 सप्टेंबरला 27 ग्रामपंचायतच्या सरपंचांनी एकत्र येऊन कंपनीच्या विरोधात जण आंदोलन करण्याचे ठरवले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष सरपंच गणेश चवले, सरपंच चंद्रकला वनशिंगे, सरपंच योगिताताई पिंपळशेंडे, सरपंच शालू ताई उताणे, सचिन बुरडकर उपसरपंच, सरपंच मंगलाताई लेवादे, सरपंच निर्मलाताई दडमल, सरपंच जयश्रीताई चौधरी, आणि या परिसरातील नागरिक झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
या परिसरातील नागरिकांना एकूण एकोना खदान मुळे मानसिक ,शारीरिक सर्व परेशानीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत कंपनीने कुठल्याही सुविधा दिलेल्या नसून कंपनीत होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना भेगा पडल्या आहेत. या परिसरातील नागरिक मरण यातना भोगतात की काय असा प्रश्न आता जनसामान्यात निर्माण झाला आहे. या गावातील अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात यावे. कंपनीत अनुज्ञान पत्रधारकाला प्राधान्य देण्यात यावे, ॲम्बुलन्स, अग्निशामक, गावात जाणारे सिमेंट काँग्रेसचे रोड, स्ट्रीट लाईट, बेरोजगारांना नोकरीच्या संध्या उपलब्ध करून द्याव्या, सी एस आर फंड निधी अंतर्गत गावाचा विकास करावा. ग्रामपंचायत एकोना गावाला खनिज निधी उपलब्ध करून द्यावी. खदान मधी होत असलेल्या विस्फोटाने गावातील घरांना भेगा पडल्या आहेत त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. परिसरात होत असलेल्या प्रदूषणावर कंपनीने नियंत्रण करावे. कंपनीत नियुक्त कार्यरत महालक्ष्मी तथा अरुणोदय कंपनीने स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. या संदर्भाचे कंपनीसोबत अनेक बैठका झाल्या असल्या तरी फक्त आतापर्यंत आश्वासन देऊन वेळ मारू धोरण कंपनीने अवलंबले आहे. या सर्व मागण्या घेऊन कंपनी एकोणा कोयला खदान संघर्ष समितीमार्फत 24 /11 /2022 ला सकाळी दहा वाजता चरूरखटी चौपाटीवर आंदोलन करण्याचे ठरविले आहे. डब्लू सी एल ने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तरी यापेक्षा आम्ही जनआंदोलन करू असे आज झालेल्या पत्रकार परिषदेतून समस्त संघर्ष समितीने वतीने करण्यात आला आहे.