27 डिसेंबर ( सुनील तायडे ) शिवसेना कार्यकर्त्यांची गुंडगिरी, चंद्रपूरचे tv9 प्रतिनिधी निलेश डाहाट यांना बेदम मारहाण चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागात अवैध धंदे करणाऱ्या शिवसैनिक विक्रांत सहारे आणि पवन नगराळे यांनी काल रात्री 11.30 वाजता चंद्रपूरचे tv9 प्रतिनिधी निलेश डाहाट यांना बेदम मारहाण केली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहारे जिल्हा युवासेना समन्वयक आहे. इंदिरानगर भागात देशोन्नती प्रतिनिधी विनोद बदखल आणि डाहाट गप्पा करत होते. तेव्हा सहारे-नगराळे यांनी तेथे पोचत अवैध धंद्यांची बातमी प्रकाशित केल्यावरून वाद केला. तो शांतही झाला. मात्र घटनास्थळावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या डाहाट यांचा सहारे-नगराळे जोडीने पाठलाग करून त्यांना रामबाग वसाहत वळणावरील मूल मार्गावरच्या माता मंदिराजवळ थांबवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावरील बांधकामाचे गट्टू त्यांना मारण्यात आले. शस्त्राचा आणि चाकूचा धाक दाखविला गेला. मदतीसाठी काही लोक थांबले तेव्हाच आरोपी पसार झाले. या घटनेत डाहाट यांना पोट-पाठीवर जबर गुप्त मार लागला आहे. सोबतच ओठ फाटल्याने टाके बसले आहेत. उपचार सुरू आहे. अवैध धंदे करायचे, वाद करायचा आणि आपल्या पिताजींचे सरकार असल्याच्या थाटात पत्रकाराला मरेस्तोवर मारहाण करायची ही आहे शिवशाही…..या मारहाणीमागे कुणाचा आदेश आहे? आरोपी शिवसैनिकांवर पोलिसांनी थातूरमातूर कलमे लावली. आमची मागणी आहे 307 कलम लावा. दाखवून द्या ,राज्यात सरकार आहे आणि लोकांचे आहे…
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ तर्फे भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.
सुनील तायडे. संपादक daily postmortem