न्यायप्रविष्ट प्रकरणात पोलिसांचा हस्तक्षेप कशाला…? वादग्रस्त प्लॉट खाली करण्यासाठी पोलिसांच्या चकरा.

149

चंद्रपूर: 23 ऑक्टोंबर ( सुनील तायडे )

न्यायप्रविष्ट प्रकरणात पोलिसांचा हस्तक्षेप कशाला…?*
*वादग्रस्त प्लॉट खाली करण्यासाठी पोलिसांच्या चकरा.*

*दिपक सिंह यांची पत्रपरिषदेत माहिती.*

भद्रावती येथील एक प्लॉटचा 4 वर्षांपूर्वी सौदा केला.प्लॉट मालकाने घालून दिलेल्या अटी पाळल्या नाही,म्हणून नोंदणी करता आली नाही.दरम्यान त्या प्लॉट धारकाला 5.50 लाख रु.दिले.वाद निर्माण झाल्याने न्यायालयात धाव घेतली.असे असतांना भद्रावती पोलीस तो प्लॉट खाली करण्यासाठी वारंवार घरी येऊन त्रास देत आहेत.प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना पोलिसांचा हस्तक्षेप कशाला असा प्रश्न या प्रकरणातील मुक्तभोगी दीपक सिंह यांनी गुरुवार(22 ऑक्टोबर)ला पत्रपरिषदेतून उपस्थित केला आहे.

दिपक सिंह यांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांनी 2017 मध्ये गौतम नगर भद्रावती येथील घराशेजारी असणारा एक प्लॉटचा सौदा कुलदीप सिंह यांचे सोबत 10 लाखात केला.या बाबत आवश्यक ते लेखी करारही केले.त्या करारानुसार रकम देण्यात आली व पावत्या घेतल्या.5.50 लाख दिल्यावर उर्वरित रकम नोंदणीच्या वेळी देण्याचे ठरले.प्लॉटवर बँकेचा बोझा असल्याने बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याची जवाबदारी कुलदीप सिंह यांची होती,पण तसे झाले नाही.दरम्यान दीपक सिंह यांनी कब्जा पत्र,टोकनचिठ्ठी,बयांनापत्र पण तयार करून घेतले.या आधारावर तेथे शेड पण तयार केले.सर्व काही आलबेल असतांना कुलदीप सिंह पोलिसांत गेल्याने दीपक सिंहने न्यायालयात धाव घेतली.असे असतांना भद्रावती पोलीस मात्र तो प्लॉट रिकामा करण्यासाठी दीपक सिंह यांना खडसावत आहेत,हे कितपत योग्य असा प्रश्न दीपक सिंह यांनी उपस्थित केला आहे.

*खासदारांच्या सुचने नंतर ही धडकले पोलीस.*

किमान एक महिन्यापूर्वी पोलिसांनी दिपक सिंह यांच्या घरी वारंवार भेट देऊन प्लॉट खाली करण्याचा तगादा लावल्याने दीपकने खासदार सुरेश धानोरकर यांचे कडे धाव घेतली.खा. धानोरकर यांनी पोलिसांना समजावले,हे सिविलचे प्रकरण असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करू नये अश्या सूचना त्यांनी केल्या.पण,एक महिन्यानंतर पुन्हा पोलीस धडकले.प्लॉट खाली केला नाही तर विविध गुन्हे दाखल करू,अशी तंबी पोलिसांनी दिली,असल्याची माहिती दीपक सिंह यांनी दिली.

*दीपक सिंहने कागदपत्र सादर करावे…..ठाणेदार भारती*

कुलदीप सिंह या 75 वर्षीय वृद्धाने तक्रार केल्यावर पोलिसांनी दीपक सिंहला बोलावून समजावले.तेव्हा त्यांनी त्यांचे कडील काहीच कागदपत्र दाखविली नाही.व प्लॉट वरील शेड काढण्याचे कबूल केले. त्या प्लॉटचा सातबारा आहे,कुलदीप सिंह याचे कडे आहे.त्यामुळे मालक तेच आहेत.त्यांनी कागदपत्रे सादर करावी.कायद्यात आहे,तीच कारवाई पोलीस करेल.दीपक सिंहने कागदपत्रे सादर करावी.अशी प्रतिक्रिया ठाणेदार भारती यांनी दिली.

सुनील तायडे                                        संपादक