चंद्रपूर: १३ सप्टेंबर ( सुनील तायडे )
बरांज कोळसा खाण बंद. 28 ऑक्टोबर नंतर कोळसा वाहतूक ठप्प करण्याची चेतावणी. वारंवार निवेदन देऊन,आंदोलन करून सुद्धा केपीसीएल व कर्नाटक एमटा कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविल्या नाही.त्यांनी केलेला करारही पळाला नाही.कोळश्याची मस्ती या कम्पनीला आली आहे.आजचे आंदोलन भाजपाचा एल्गार आहे.आम्ही हात जोडून प्रश्न सोडविण्यासाठी आलो आहो.ऐकत नसाल तर हात सोडून येऊ.येत्या 28 ऑक्टोबर पर्यंत केलेल्या कराराचे पालन करा.अन्यथा कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प करू असा गर्भित इशारा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांनी बरांज(भद्रावती)खुली कोळसा खाण बंद करून दिला.
ते भारतीय जनता पार्टी तर्फे बरांज खुली कोळसा खाण(भद्रावती) येथे “कोळसा खाण बंद” आंदोलनाचे नेतृत्व करतांना मंगळवार(13 ऑक्टोबर)ला जनसभेत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,जिप अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे सह भाजपाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
आ.मुनगंटीवार म्हणाले,आमची मागणी कायद्याच्या चौकटीतील आहे.कोळसा उत्पादनाला आमचा विरोध नाही.परंतु जमिनीतून सोनं काढणारा शेतकरी त्यापेक्षा महत्वाचा आहे.रावणीवृत्ती ठेवून बळीराजाचे हाल करीत असाल तर या वृत्तीचे दहन केल्याशिवाय राहणार नाही.असेही ते म्हणाले.समान काम समान वेतन हे लागू करून कोल वेज ऍक्ट नुसार कामगारांना वेतन द्यावे अशी मागणी त्यांनी केली.ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देऊ शकत नाही त्यांना करार प्रमाणे 5लक्ष रु तात्काळ द्यावे,50% शेतजमीन,4 लक्ष रु रकम एकमुश्त द्यावी,पुर्नवसन करावे अश्या अनेक मागण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
*एक नेता 100 गावकरी आंदोलन*
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन केले जाणार आहे.बुधवार पासून बरांज परिसरातील जिल्हापरिषदेच्या रस्त्यांवरील जड वाहतूक अडविण्यात येणार आहे.एक नेता 100 गावकरी या आंदोलनात सहभागी होतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली.या नंतर रेल्वेने होणारी वाहतूक ठप्प केली जाईल असा इशाराही देण्यात आला.
*अशी केली कोळसा खाण बंद..*
बरांज खुली खाण च्या प्रवेश मार्गावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा वळविला.तेथे असलेल्या जेसीबी मशीनने रस्ता खणण्यात येऊन खाण बंद करण्यात आली.
-
- सुनील तायडे संपादक