चंद्रपूर: ४ ऑक्टोबर ( सुनील तायडे )
बरांज खुल्या कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात कोळसा खाण बंद आंदोलन.
या आंदोलनात प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आवाहन. बरांज खुली कोळसा खाण ही सन २००७ पासून कार्यरत आहे. सदर कोळसा खाणीकरीता एकुण १४५७ हे. आर. जमिन संपादीत करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावात संपादीत करत असतांना तत्कालीन खासदार हंसराजजी अहीर यांनी संघर्ष करून शेतकऱ्यांना शेतजमीनीचा उचीत भाव मिळवून दिला. पुनर्वसन, नोकरी उर्वरीत शेती संपादीत करणे व इतर समस्यांसाठी संघर्ष सुरू असतानांच सन २०१४ मध्ये मा. सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशान्वये सदर कोळसा खाणीचे आवंटन रदद करण्यात आले. त्यानंतर ही कोळसा खाण कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लि. व्दारा प्रत्यक्ष स्वरूपात डिसेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आली. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या व कामगारांच्या समस्या न सोडविता कोळसा खाण सुरू झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. परीणामी दि. १७ एप्रील २०२१ रोजी तहसील कार्यालय भद्रावती येथे प्रकल्पग्रस्तू व कामगार यांचे वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी मा.आ. सुधीरजी मुनगंटीवार यांनी भेट देवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणुन घेवून जिल्हा प्रशासनाला आणि कंपनी प्रशासनाला कळविले किंबहुना बैठका सुध्दा घेतल्या परतू कंपनी व जिल्हा प्रशासनाची भुमीका नकारात्मक असल्याने आजपर्यंत मागण्यांची पुर्तता झालेली नाही. त्या करीता भारतीय जनता पार्टोच्या वतीने दिनांक १३ आक्टोंबर २०२१ रोजी खाण बंद आंदोलन करण्यात येत आहे.
सुनील तायडे संपादक ९४२२१४००४५