गलेलठ्ठ शासकीय पगार तरीही, पोलीस अधिकाऱ्याची10 लाखाच्या वर अवैध वसुली? शासकीय पगारात पोट भरेना वाटतंय?

1689

चंद्रपूर 28 मे
गलेलठ्ठ शासकीय पगार मात्र तरी पोट भरेना, कायद्याच्या चौकटीत ज्यांच्या खांद्यावर सुरक्षेचा भार असताना त्यांची परिक्रमा,ही हफ्त्या वरच लक्ष केंद्रित करून असतात.एक नाही दोन नाही तर दर महिन्याला 10 लाखाच्या वर अवैध वसुलीची जवाबदारी सिंदेवाही पोलीस स्टेशन चे दोन कर्मचारी पार पाडतात!

रद हा संपूर्ण ट्रॅफिकिंग मधून जवळपास साढे तीन लक्ष रुपये जमा करतो तर रणधीर सात लाखाच्या वर वाळू तस्करी, सट्टा, जुगार अवैध दारू विक्री तसेच तस्करी करणाऱ्या कडून दर महिन्याकाठी जमा करतो?

आच्यर्यांची बाब म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा असो की विशेष पथक यांची कुठलीही मोठी कारवाई पाहिजेल तशी या ठिकाणी पाहवयास मिळाली नाही. हे विशेष!

सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार तुषार चव्हाण हे अत्यंत मनमिळाऊ ठाणेदार म्हणून जिल्ह्यात प्रचलित आहे. त्याचा स्वभावात अत्यंत गोडवा असल्याने ते तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.

चंद्रपूर जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर तुषार चव्हाण रुजू झाले असता त्यांना सायबर सेल ला देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लगेच कोठारी पोलीस स्टेशन ची जवाबदारी देण्यात आली होती. त्यांची कार्यशैली “इस हाथ दो उस हाथ लो “ही चांगलीच प्रचलित होत असताना त्यांनी आपल्या काही जवळच्या लोकांना सुद्धा तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांच्या मार्फत चांगल्या ठिकाणी प्रसाद घेत पदभार दिला असल्याचे पोलीस खात्यात बोलले जाते?

या साठी मोठा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे? तुषार चव्हाण यांना कोठारी पोलीस स्टेशन वरून लगेच सिंदेवाही पोलीस स्टेशन चा चार्ज दिला गेला.त्यांची तत्कालीन पोलीस अधीक्षकाशी असलेली जवळीक त्यांना “सु-मधुर”संबंधात दिल्याने जिल्ह्यातील अनेक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या “भुवया”उंचावून गेल्या होत्या!
तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांची चंद्रपूर जिल्ह्यातून अचानक बदली झाल्याने नवीन
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन रुजू झाले. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता सर्व पोलीस अधिकारी कारवाई चा फास आवरत होते. मात्र काहींना आपले तेल तूप कसे याचेच वेड लागले होते. महिन्याकाठी गलेलठ्ठ मिळणारी लाखो च्या राशी ला कसे सोडायचे याचेच भान लागले होते?

सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्धीचे ठाणेदार तुषार चव्हाण ( सहाय्यक पोलीस निरीक्षक )यांना शासनाकडून दरमहा जवळपास 85 हजार रुपयाचा पगार दिला जातो तरी मात्र शासनाच्या या पगाराने त्यांचे भागत नसल्याचे विदारक चित्र त्यांच्या कृतिवरून दिसून येत आहे?

.💥💥कुठले आणि कीती अवैध धंद्याची वसुली?

अवैध रेती वाहतुकीची जवळपास 40 ट्रॅक्टर आणि दुसरीकडून येणारी मोठी ट्रके यांच्याकडून,जवळपास महिन्याकाठी “पाच लाख”रुपयाची वरकमाई वसुली शिपायाकडून घेतली जात असल्याची विश्वासनीय माहिती आहे?
सट्टा, जुगार, रेती चोरी,अवैध दारू विक्री आणि देशी भट्टीतून दारू ची ग्रामीण भागात होणारी तस्करी यांच्याकडून दरमहा एकूण साढे साथ लाख रुपयाचे वसुली साठी रणधीर ला जवाबदारी पार पाडण्याचे काम दिले आहे?

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कितीही कारवाई चा फास आवरतांना दिसत असेल पण वसुलीचाही गौड बंगाल करण्यात काही अधिकारी माहीर असल्याचे बोलल्या जात आहे?
खाद्या अधिकाऱ्याला जर भ्रष्टाचाराची लथ लागली असेल तर त्याला शासकीय पगार कितीही दिला तरी त्याचे काही पोट भरतच नाही? जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सध्या तरी क्लिन चिट असल्याने त्यांच्या कार्यकिर्दीत होणाऱ्या वसुली तला ते केव्हा चाप बसवेल हे येणारी वेळच ठरवेल.