सबके सब…. मिलिभगत.. आयुक्त ते बाबू येणार रडारवर, चंद्रपूर जिल्ह्यातील त्या 60 परवण्यासाठी 9 कोटी चा चढावा?

1864

चंद्रपूर -पुणे /मुंबई 28 मे (सुशांत घाटे )- राज्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्टाचाराचे रंगा रंग किस्से उजेडात येऊ लागले आहे.

पुणे मध्ये कश्या प्रकारे दारू व्यावसायिका कडून पैसे उकळून परवाने दिले गेले आणि त्याची महिन्या काठी कशी वसुली करण्यात येत आहे,याचा खुलासास राजकीय पक्षांनी आकड्या सहित नाव घेत केला आहे.शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा करेक्ट कार्यक्रम च केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील रिजेक्ट लायसन्स ला मुंबई एक्ससाईझ ची सेटिंग साथ…..
जि
ल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी बराच खेळ खेळत चंद्रपूर ते मुंबई दारू लायसन्स वारी केली आहे.

जिल्ह्यातील जवळपास 60 दारू परवान्यांना जिल्हाधिकारी मार्फत रिजेक्ट करत हे प्रकरण आपल्या आका कडे, म्हणजेस मुंबई येथे एक्ससाईझ कमिशनर कडे दाखल करत त्याला पास आऊट केले असल्याचे उघड झाले आहे?

60 दारू लायसन्सी पास आऊट करण्यासाठी विशिष्ट लाखो रुपयाची म्हणजेस एका परवण्यासाठी 15 लक्ष ची देणगी सुद्धा या ठिकाणी चढवण्यात आली असल्याची खात्रीलायक बातमी आहे?

एक्ससाईझ मुंबई येथिल आयुक्त विजय सूर्यवंशी, उप आयुक्त बोडखे आणि आयुक्त चे मुख्य कलाकार असलेले वरिष्ठ कारकून कांबळे हे याचे मुख्य सूत्रधार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

रिजेक्टड दारू लायसनची परवाने वाटप साठी सेटिंग बहादूर टीम च राज्यात कार्यान्वित असल्याने यांचा भ्रष्टाचाराचा मोठा गड च मानला जातं आहे. चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाच प्रकरणात अडकलेले निलंबित अधीक्षक संजय पाटील यांचा भ्रष्टाचार हा कोट्यावधीच्या श्रेणिताला आहे. आणि यांचा भ्रष्टाचार चा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मुंबई येथील आका ला ही अँटी करप्शन विभाग लवकरच पाचराण करणार असल्याची गुप्त माहिती आहे.

विवादित,नियमात न बसणाऱ्या लोकांनाही पैशाच्या जोरावर बार परवाने दिल्याने,आता यांच्यावर टांगती तलवार लटकली आहे.
जिल्ह्यात भ्रष्ट यंत्रनेला कार्यान्वित अधिकाऱ्यांची फौज!

जिल्ह्यातील अभिनंदन, थोरात, लिचडे, पवार, क्षीरसागर, पाटील यांनीही आतापर्यंत धुवाधार बल्लेबाजी केली आहे. निलंबित अधीक्षक पाटील सोबत यांचीही चौकशी लावण्या करीता तक्रार करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. एका मंत्राच्या माध्यमातून आपली जवळीक साधणाऱ्या कोल्हापुरी पॅटर्न चा लवकरच छडा लागणार आहे. त्याकरिता त्या दिशेने तपासचक्र फिरू लागले आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्या हॉटेल चे परवाने कशे यावर लक्ष घालावे?
चंद्रपूर – गडचिरोली महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असते. यामध्ये कितीतरी अपघात घडले असताना चंद्रपूर जवळील लोहारा ते चिंचपल्ली पर्यंत बेधुंद होत हॉटेल व्यवसाय उभारात रोड ला च पार्किंग बनवून टाकली आहे? हॉटेल व्यावसायिक असलेल्या लोकांकडे पार्किंग च उपलब्ध नसेल तर त्यांना कोणत्या बेसवर बार, फूड चे लायसन्स आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले हा तारांकित प्रश्न उभा होत आहे? त्यामुळे यांचीही चौकशी करत योग्य कायद्याची बाजू दाखवणे तेवढेच गरजे चे आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा आज अटी शर्ती चा चार वाजता प्रियदर्शनी हाल येथे जिल्ह्यातील बार परवाने धारकांना डोज देणार आहे?