राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधीक्षक संजय पाटील “ला आलिशान रिसॉर्ट मधून अटक!

1789

चंद्रपूर -(14 मे )राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा जिल्ह्यातील पांचगणी येथील एका” रिसॉर्ट”मध्ये लपून बसलेल्या ठिकाणाहून अटक केली आहे.

एका बियर शॉपी च्या प्रकरणात एक लाखाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लाचेची मागणी करणाऱ्या अधीक्षक संजय पाटील यांच्या वर ACB ची शोध मोहीम सुरूच होती.

यातील दोन आरोपीना न्यायालयाने जमानत मंजूर करत मुख्य सूत्रधार असलेल्या अधीक्षक पाटील यांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळाला असताना ACB च्या टीम ने शोध मोहीम राबवत पाटील यांची गोपनीय माहिती मिळताच ACB चे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, वैभव घाडगे, अमोल सिडाम हे आपला ताफा घेऊन पाचगणी, महाबळेश्वर जिल्हा सातारा येथून आरोपी असलेल्या संजय पाटील यांना अटक करीत चंद्रपुरात आणले. दरम्यान आज कोर्टात पेशी केली असता त्यांचा 16 तारीखे पर्यंत PCR देण्यात आल्याची माहिती आहे.
चंद्रपूर ACB च्या या धडाकेबाज कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित भ्रष्टाचार या अटक कारवाईने आता चव्हाट्यावर येणार असल्याचे गोपनीय वृत्त आहे.

अधीक्षक संजय पाटील यांची कसून चौकशी सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

चंद्रपूर ACB च्या पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या कारवाईने सध्या भ्रष्टाचार करीत असलेले काही प्रशासनातील अधिकारी दोन हाथ दूर राहण्याचा पवित्रा घेत आहे.

या अटकेमुळे आणखी या भ्रष्टाचार यंत्रनेत कोणाचे कीती आणि कोन याचे ACB ला लवकरच उत्तर मिळणार आहे.