चंद्रपूर 14मे – कोळसाच्या तस्करी च्या दुनियेतेला एक नवे तर अनेक “बादशाह “आता पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात आपली कारकीर्द गाजवून गेले आहे. एकेकाळात युनूस, फझल, सुरेश,बंडू, रॉय,देवांनंद,ईदरीश या लोकांनी मोठ्या प्रमाणात चक्क मालगाडी ला थांबवत कोळसा तस्करी केली मात्र ती आता पडद्या आड गोष्ट गेली?
असताना या तस्करी चा आता नवा बादशाह राजुऱ्यातील निझाम आणि शिव आहे.
कोळसा खाणीतून येणाऱ्या गाडीतून आपल्या ठिय्यावर “राजुरा” आणि “स्वास्ती “या भागात कोळसा टाल डेपो थाठत मोठ्या प्रमाणात कोळसाची चोरी करण्यात येत आहे.पोलिस विभाग चादर” पांघरून “या विषयावर झोप घेत असल्याचे दिसत आहे.
जगजाहीर पद्धतीने कोळसा दिवसा ढवळ्या चोरी होत असताना राजुरा पोलिसांची कामगिरी “शून्य” च म्हणावे लागेल?
निजाम सारख्या कोळसा तस्कर नी गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी आपले बस्थान मांडून कोट्यावधीचा कोळसा या ठिकाणाहून तस्करी करून चंद्रपूरातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकत आहे.
मात्र पोलिसांची नेमकी या विषयी भूमिका काय हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे?
एकीकडे कारवाई चा सुतोवात करत असताना कोळसा तस्करी ला देण्यात आलेली छुट म्हणजे “अर्थ” कारण असल्याचे बोलल्या जातं आहे. कोळसा तस्करांनी सास्ती, गोवरी, पवनी या कोळसा खदानीतून येणाऱ्या कोळसा ट्रक ला विशिष्ट ठिकाणी थांबा देऊन त्यातील एक दीड टन कोळसा (प्रत्येक वाहनातून )खाली करत 24 तासा मध्ये जवळपास 200 गाडी मधून कोळसा खाली करण्यात येत आहे?
दररोज 200 टन कोळसा हा जवळपास 100000 लक्ष रुपयाचा होत असून या विजयाचा शिल्पकार निजाम आणि शिव असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे?
सध्या कोळसा बाजारात कोळसा चा भाव जरी कमी झाला मात्र या तस्करांची पॉलिसी, “पोलीसी “विभागाच्या आशीर्वादाने चांगलीच फल फुलली आहे?
दरमहा लाखो रुपयाचा हफ्ता देत थाटपणे चालणाऱ्या या व्यवसायाच्या काळ्या चिट्या चंद्रपूर पासून जुळून आहे?
राजुरा आणि स्वास्ती भागातून कोळसा तस्करीला नेमके कुणाचे अभयदान हा भ्रमात पडलेला प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात रेती तस्करीला चाप बसवत असताना राष्ट्रीय संपत्ती ची चोरी होत असताना आतापर्यंत साधी कारवाई सुद्धा या कोळसा तस्करावर पोलिसांना करता येत नाही का हा जनसामान्य नागरिकांत पडलेला प्रश्न आहे?
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जर निजामचे साटेलोटे ची चौकशी केल्यास धक्का दायक गुपित समोर येऊ शकते?
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे सूत्र हाथी घेताच अवैध धंद्ध्यावर बडगा उभारला मात्र त्यांच्या या चौकटीतुन कोळसा तस्करी चा विषय सुटूनच गेला!
राजुरा तालुक्यात या कोळसा तस्करांचे कितीतरी गँग वार झाले मात्र तरीही या धंध्याला हिरवा कंदील देणारे अधिकारी कौन?
सध्या च्या परिस्थितीत निजाम नी या हद्धीत आपले साम्राज्य उभारले ची चर्चा जोरात सुरु आहे! “चाचा “नावाने ओळखल्या जाणाऱ्या निजाम नी छोटे मोठे तस्कर जमा करत वन हॅन्ड मोव्हमेन्ट चा “छल्ला “राजुरा तालुक्यात चमकवीला आहे.
दिवसा रात्री कोळसा तस्करी ला गती देत काळोख माजवाणाऱ्या तस्कराना पोलीस विभाग आवरेल का हा पोलीस अधीक्षकांना सामान्य जनतेतून थेट प्रश्न विचारण्यात येत आहे!