<>चंद्रपूर (12 मे )चिमूर – रम्मी जुगार,ऑनलाईन लॉटरी जुगार, विडिओ गेम, सट्टा बाजार, रेती तस्करी, दारू तस्करी, क्रिकेट बूकी यांचा अड्डा म्हणजे आता चंद्रपूर जिल्ह्यातील “चिमूर” तालुका बनला आहे?
सध्या या धंद्याना रान मोकळे करून देण्यात आल्याने, या मागचा “म्होरक्या “कोन हा अनउत्तरित प्रश्न सामान्य जनतेसह पोलीस खात्यातील काही अधिकाऱयांना पडला आहे?
अशी कोणती गुरुकिल्ली या पोलीस स्टेशन च्या हद्धीत कार्यरत आहे,जी या अवैध धंद्धयाना प्रोत्साहन देत धाब्यावर बसवत चालना देत आहे!हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे?
चिमूर पोलीस स्टेशन च्या हद्धीत चालणाऱ्या,या अवैध धंद्याना ठाणेदार संतोष बाकल यांची” मुकसंमती” च मानावे लागेल?
जिल्ह्यात अवैध धंद्याना चाप बसवत अनेक पोलीस स्टेशन च्या हद्धीत कारवाई करण्यात येत असताना, नेमके चिमूर पोलीस स्टेशन च्या हद्धीत पाणी कुठे मुरताय हा संशोधनाचा विषय ठरत आहे!
ज्या व्हिडिओ गेम पार्लर नी प्राण घेतले, अनेकांच्या संसाराची राख रांगोळी केली अशा ला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील विडिओ पार्लर ला बंद केले असताना,चिमूर तालुक्यात खडसंगी रोड वर चालणाऱ्या या विडिओ गेम ला ही अनुमती देने म्हणजे काय?
गव्हर्नमेंट लॉटरी च्या नावाखाली ऑनलाईन लॉटरी(fraud )चा जुगार चालवणे म्हणजे काय? गोंदिया मधून चालणाऱ्या या ऑनलाईन लॉटरी चा व्यवसाय म्हणजे सब गल्ला अपना असताना पोलिसांना माहिती नाही का? असे अनेक प्रश्न सध्या जनसामान्य नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे.
जिल्ह्यात पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अवैध धंद्ध्यावर कारवाई करीता एक विशेष पथक कार्यरत असताना त्यांनाही याची माहिती नाही का?
साफ छवीचे पोलीस अधीक्षक म्हणून सध्या नावलौकिकास आलेले चंद्रपूर जिल्ह्यातील मुम्मका सुदर्शन यांची कारकीर्द अवैध धंद्धयावर चांगलीच मुस्कट दाबी करत असताना चिमूर पोलिसांना याचा विसर पडला की काय?
हे समजायला अवघड जातं आहे? नेमकी अशी कोणती “गुरुकिल्ली “या ठिकाणी कार्यरत आहे हे महत्वाचे जिल्ह्यात सध्या चिमूर पोलिस स्टेशन हद्धीत नो टेन्शन चे अवैध कामकाज माहेरघर बनवून बसल्याचे धक्का दायक वृत्त समोर आहे?