चंद्रपूर 9मे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाचखोरी च्या प्रकरणात चंद्रपूर ACB कडून अटक होताच मुख्य सूत्रधार असलेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधीक्षक संजय पाटील हा भूमिगत झाला आहे.
बिअर शॉपी च्या परवण्यासाठी एक लाखाची लाच घेताना एक्ससाईझ चा दुय्यम अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक यांना रंगेहाथ ACB च्या अधिकाऱ्यांनी चंद्रपूर कार्यालयात पकडले असता भ्रमनध्वनी च्या माध्यमातुन भ्रष्टाचार च्या संपर्कात असलेला अधीक्षक संजय पाटील हा ACB च्या रडार वर आहे?
संजय पाटील नी गेल्या दोन वर्षात कोट्यवधीचा भ्रष्टाचार करत चंद्रपूर जिल्ह्यात नियमाला तिरांजली देत वरिष्ठ अधिकाऱ्यांची लॉबीन्ग करीत दरमहा आणि दारू परवाने च्या नावाखाली कोट्यवधीची लाच घेत ते वरिष्ठ अधिकारी पर्यंत पोहचवली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
ज्या दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ACB ने ट्रॅप केले आहे त्यांच्याकडून बरीच माहिती या भ्रष्टाचार संबंधि बाहेर आली असल्याचे गोपनीय वृत्त आहे.
जो पर्यंत मुख्य लाचेचा सूत्रधार असलेला एक्ससाईझ एस पी संजय पाटील ला ACB अटक करणार नाही तों पर्यंत संपूर्ण माहिती बाहेर येणार नाही.
या प्रकरणात अँटीसिपीटरी जामीना साठी राज्य उत्पादन विभागाचा अधीक्षक संजय पाटील बलाढ्य दारू व्यवसयिक च्या माध्यमातून सक्रीय असल्याची माहिती आहे.
दरम्यान ACB कोल्हापूर नी संजय पाटील यांच्या कोल्हापूर येथील दोन बंगल्या च्या झडत्या घेत लाखो रुपयाचे दोन्ही बंगल्यातून सोने आणि नगदी रोख तसेच आलिशान गाडी जब्त केल्या आहे.
चंद्रपूर येथील त्यांच्या निवास्थानी ACB नी सील ठोकले आहे. जनसामान्य नागरिकांत भ्रष्टाचार प्रकरणात मोठा मासा असलेल्या अधीक्षक संजय पाटील याला जो पर्यंत अटक होत नाही तों पर्यंत याचे पूर्ण कनेकशन बाहेर येणार नाही या करीता त्याला शोधून काढा अशी मागणी सुद्धा होऊ लागली आहे.
न्यायालयाने सुद्धा अशा भ्रष्टाचारखोर अधिकाऱ्याला अँटीसिपीटरी बेल न द्यावी ही जन माणसातून मागणी होत आहे.
अनेक नागरिकांना पायपीट करावयास लावणाऱ्या आणि भ्रष्टाचार नी ग्रासलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सध्या चांगलाच बँड वाजला आहे!
जर या प्रकरणाचा सखोल तपास झाला तर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोबत चंद्रपूर जिल्ह्यातील तत्कालीन पोलिस खात्याचा बडा अधिकारी सुद्धा भ्रष्टाचार प्रकरणी ACB च्या हाथी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जातं आहे.
जिल्ह्यात टॉप टू या मोठ्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधीची संपत्ती गोळा करत मोठी खेळी खेळली आहे?
पोलिस दलातील तों बडा अधिकारी ही ACB च्या रडारवर येणार असल्याचे गोपनीय वृत्त आहे.
अधीक्षक पाटील भेटल्यानंतर च पूर्ण सत्य समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे ACB च्या कस्टडी मध्ये असलेले दोन कर्मचारी यांना तों पर्यंत जामिन नाही व्हावा जो पर्यंत अधीक्षक पाटील याला अटक होत नाही?
सध्या ACB चे पथक संजय पाटील याच्या मागावर असल्याचे सांगितले जातं आहे.