दहा कोटींचा कोळसा गहाळ करणाऱ्या इंडो युनिक कोल वॉशरी चा मालक विपुल चौधरी वर गुन्हा दाखल!

310

नागपूर 8मे –
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सालोरी येथील बी. एस. इस्पात कंपनी ला
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील भाल्लर रोडयेथील एम आय डी सी भागातील इंडो युनिक फ्लेम लिमिटेड कोल वॉशरी ने कोळसा वॉश च्या नावाखाली
दहा कोटी रुपयाचा कोळसा हडप केल्याने कोल वॉशरी चे संचालक विपुल चौधरी वर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
बी
. एस इस्पात लिमिटेड कंपनी चे उपाध्यक्ष सागर कासनगोट्टूवार यांच्या तक्रारी वरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण…….
स्टील आणि ऊर्जा प्रोजेक्ट असणाऱ्या बी. एस. इस्पात लिमिटेड कंपनी ने मुकुटबन येथील मालकीच्या कोळसा खाणीतून इंडो युनिक वॉशरी येथे कोळसा वॉश करण्याचे लेखी कंत्राट केले होते.
41000 हजार काही मेट्रिक टन कोळसा या वॉशरी तुन बी. एस. इस्पात कंपनी ला घेणे होते त्यापैकी 16000टन च कोळसा वॉशरी ने परत फेड केला आणि उर्वरित कोळसा देण्यास टाळाटाळ करण्यास सुरु केली, वारंवार सूचना आणि कंपनी तर्फे पत्र व्यवहार करून सुद्धा आरोपी विपुल चौधरी यांनीकुठलाच प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत बी एस इस्पात लिमिटेड कंपनी चे उपाध्यक्ष सागर कासनगोट्टूवार यांनी कोल वॉशरी चे संचालक विपुल चौधरी यांच्या वर दहा कोटी रुपयाचा कोळसा गहाळ केल्या प्रकरणी वरोरा पोलिस स्टेशन ला तक्रार दिली तक्रारी च्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी विपुल चौधरी वर गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे.
4000 रुपये प्रती टन प्रमाणे 25000 मेट्रिक टन कोळसा गबन करण्याचा हा नवीनच हाथ कंडा वापरल्याने कोल वॉशरी ला कोल वॉश साठी कोळसा द्या चा की नाही हा अनेक ऊर्जा कंपनी ना आता प्रश्न पडला आहे?
दहा कोटींचा गंडा घालणाऱ्या विपुल चौधरी चा तपास चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा कडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.