LCB चा दणका ‼️ब्रह्मपुरी त रेती तस्करांवर कारवाई करीत सहा आरोपी अटकेत

803

चंद्रपूर 07 मे – जिल्ह्यातील अवैध धंद्याना चोपून काढत स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात रेती तस्करी चे कंबरडे मोडले असताना मात्र चिमूर आणि ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन च्या हद्धीत रेती तस्कर सज्ज!असल्याची दोन दिवसापूर्वी डेली पोस्टमार्टम नी बातमी प्रसारित केली होती.
मुख्यता रेती तस्कराची राजकीय लॉबी कार्यरत असल्याने लांब लचक फार्मुला घेऊन हे व्यावसायिक नदी ला पोखरत रेती चे उत्तखंनं नदी पात्रातून करत चालना देत व्यवसाय थाटून बसले होते.
मात्र याची कुणकुण लागताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
महेश कोंडावर यांनी ऍक्शन प्लॅन बनवत आपल्या टीम ला चिमूर आणि ब्रम्हपुरी येथे तळ ठोकण्यास सांगितले असता रात्री ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्धीत नदी पात्रातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रेती माफियाचे सहा ट्रॅक्टर पकडत दणका दिला आहे!
या पोलीस स्टेशन हद्धीत वरद हस्थाला स्थानिक गुन्हे शाखेने चपराक बसवल्याने चंद्रपूर पर्यंत त्याचा फटका बसल्याची रात्री ओरड होत होती! बहुतेक हायवा गाड्याच्या मालकांनी काल स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा मागोवा घेतला पण त्यांना चकमा देत महेश कोंडावार यांच्या युक्तीने त्यांच्या टीम ने ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन च्या हद्धीत मोठी कारवाई करत “ये नही चालेबा” चा नारा देत जबर दणका दिला आहे?
इतक्या मोठ्या प्रमाणात रेती ची तस्करी सुरु असताना ब्रह्मपुरी पोलीस प्रशासन ला माहिती नाही का की डोळे झाकून मुकदर्शक बनले आहे!
हे या कारवाई ने सिद्ध होत आहे. चंद्रपूर वरून 130 km वर कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे या नंतर ही दणकेबाज कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी डेली पोस्ट मार्टम ला सांगितले आहे.