काँग्रेस – भाजप ची काटेरी लढत?

733

चंद्रपूर (13 एप्रिल )- लोकसभा निवडणुकीची मतदानाची तारीख जशी- जशी जवळ येत आहे, तस-तसा उमेदवार हे साखळी निर्माण करत जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रातील गाव, तालुके पिंजून काढत आहे.
चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा मतदार संघात थेट काटेरी दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
भाजप आणि काँग्रेस च्या दोन्ही गोटामधले कार्यकर्ते हे प्रचार यंत्रणा राबवत आप आपल्या उमेदवारांचे कर्तव्य निष्ठ काम करत असल्याचे दिसत आहे.
भाजप चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात काट्याची टक्कर होण्याचे संकेत आहे.
ग्रामीण भागातील संपूर्ण एरिया पिंजून काढत आपली शक्ती पणाला लावत काँग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर सध्या प्रचारच्या आघाडीवर असल्याचे बोलल्या जातं आहे.
कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि विश्वासातले नेते हे त्यांचे प्रमुख केंद्र असल्याने त्यांचा विजयाचा दावा काँग्रेस च्या गटातून केला जात आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार गडचिरोली लोकसभा क्षेत्रात काँग्रेस च्या उमेदवार च्या प्रचारार्थ व्यस्त असल्याने अद्याप त्यांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात प्रचाराचा नारळ फोडता आला नाही.

विजय वड्डेटीवार करणार धमाकेदार एन्ट्री!…

मात्र त्यांचे कार्यकर्ते आणि नेते धानोरकरांच्या प्रचाराला साथ देत आहे. विजय वड्डेटीवार यांची चंद्रपुरात लवकरच धमाकेदार प्रचाराची एन्ट्री होणार असल्याची माहिती काँग्रेस च्या गोटातून आली आहे.
काँग्रेस चे आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाळे यांनी धानोरकर यांचा पंजा सध्या लढवत असल्याचे चित्र दिसत आहे.
वणी आर्णी या दोन मतदार संघात ही काँग्रेस ला मोठा प्रतिसाद भेटत आहे. दुसरीकडे काँग्रेस उमेदवार ला मोठ्या प्रमाणात विभिन्न घटक पक्ष, संघटना यांचा मोठ्या प्रमाणात समर्थन लाभत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तेली समाजाने सुद्धा जाहीर पाठिंबा दिल्याने मोठा फायदा काँग्रेस च्या या उमेदवार ला होणार हे भाकीत आहे.
शेवट च्या घडामोडी पर्यंत सध्या तरी काँग्रेस फ्रंट फूट वर असल्याचे बोलल्या जातं आहे.

विधानसभेचा दांडगा अनुभव आणि तब्बल 30 वर्षाची मतदारांनी दिलेली साथ ही सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाची पावती आहे.
जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन्ही विधानसभा क्षेत्रात त्यांनी आपले विकासाचे पॅटर्न तैयार केले?
राज्याच्या प्रमुख मंत्री मंडळात त्यांचे प्रमुख स्थान आहे अचानक लोकसभा निवडणुकी ची माळ त्यांच्या गळ्यात आल्याने भाजप च्या गटात आनंदाचे वातावरण पाहावंयास मिळाले आहे.
मतदार संघ मोठा असल्याने त्यांची चांगलीच धावपळ होत आहे.
अपक्ष आमदार जोरगेवार न्यूट्रल गियर वर?
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार सध्या न्यूट्रल गियर वर दिसत आहे, राज्यात महायुती ला समर्थन देणारे आमदार जोरगेवार प्रचारा पासून दूर राहण्याचा पवित्रा घेत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे?
त्यांच नेमके कुणाला समर्थन या विषयी तर्क वितर्क यांना ऊत आला आहे?
भाजप चे जेष्ठ नेते हंसराज अहिर सुद्धा प्रचारापासून दूर असून त्यांचे कार्यकर्ते सुद्धा शांत आहे.
हंसराज अहिर हे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असल्यामुळे कदाचित प्रचारात सहभागी होऊ शकत नाही असे त्यांच्या काही कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली आहे?
मात्र हा शांत स्वभावाचा विरोध तर नाही यामुळे अंतर्गत गटबाजी ला उधाण आल्याचे दिसत आहे.

भाऊ च्या विजयासाठी कार्यकर्त्याची बांधणी?

सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी भाजप च्या एका गटात जोरदार प्रचाराच्या यंत्रणा राबवत जातं आहे.
शहरी भागात सध्या सुधीर मुनगंटीवार यांचा विकासाचा शिक्का उमटत आहे.
कार्यककर्त्यांची मोठी फळी आणि विकासाची हमी हे त्यांचे शब्द सध्या चर्चेत आहे.
काँग्रेस व भाजप या दोन्ही गटामध्ये अंतर्गत गटबाजी असली मात्र ती आत मध्येच मतांची घुटमळ करत आहे?
त्यामुळे आपला विरोधक हा कौन हे दोन्ही उमेदवारांना कळेनासा झाला आहे?
शहरी, ग्रामीण मतदार संघ आता या दोन्ही ही उमेदवारां साठी जणू आखाडाच बनला आहे?

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ठासून प्रचाराची धुरा संभाळात आहे?
अखेरच्या दिवसापर्यंत अनेक घडामोडी घडणार असून सध्या काँग्रेस फ्रंट फूट वर टॉप गियर घेऊन आपला पंजा चालवत आहे?
तर दुसरीकडे भाजप चे मुनगंटीवार सुद्धा लोकसभा निवडणुकीत संसदेत पोहचण्या करीता अथक प्रयास करीत आपले नियोजन बद्ध गणित मांडत आहे.