महाविद्यालय परिसरातील “चांदा बियर शॉपी “ला बंद करण्याची सामान्य नागरिकांची मागणी!

773

चंद्रपूर 12एप्रिल – दारूबंदी हटल्या नंतर जिल्ह्यातील मागील दारू दुकानाचा आकडा पाहता तब्बल अडीच पट वाढ होत दारू दुकानें उघडल्या गेली आहे. देशी दारू ची भट्टी , विदेशी दारूचे वाईन शॉप तसेच बीअर शॉपी चे लायसन्स मोठ्या प्रमाणात दारू उत्पादन शुल्क विभागाकडून रीतसर तपासणी करत दिल्या गेले आहे.

मात्र यातील काही जे लायसन्स ज्या ना हरकत प्रमाण पत्रा
(N. O. C)वर दिल्या गेले ते आता वादाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे निदर्शनास येत आहे?नागरिकांनी आता त्यावर कारवाईची मागणी ही केली आहे.

चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात अगदी रोड च्या बाजूला साई हेरिटेज कॉम्प्लेक्स च्या मुख्य द्वारा च्या शेजारी “चांदा बियर शॉपी “चे दारू दुकान थाटले गेले आहे?
सदर दारू दुकानचे लायसन्स क्रमांक 72 असून मालक वैशाली संजय तुमराम हे आहे.
विशेष म्हणजे या बियर शॉपी ला “ना हरकत प्रमाणपत्र “देणारे चंद्रपूर महानगर पालिकेतील ते झोन अधिकारी कौन हा महत्वाचा विषय सध्या चर्चेत आला आहे?
ज्या पवित्र दिक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, तसेच शासकीय तंत्रनिकेतन (ITI)कॉलेज या दारू च्या दुकानापासून 50मीटर ही दूर नसताना नियमाला ति्रांजली देत कुठल्या नियमाच्या आधारावर या बिअर शॉपी ला NOC देण्यात आली आणि यात कीती रुपयाची मांडवली झाली हा गंभीर आरोप सध्या नागरिकांकडून होऊ लागला आहे?

महाविद्यालयातील तरुण युवक वर्ग हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या चांदा बियर शॉपी तुन सर्रास बियर च्या तसेच वाईन च्या बॉटल्या वरोरा नाका चौकात तील गल्लीत रिचवत आनंद नाचवत असल्याचा प्रकार दिसत आहे?
ज्या वयात या तरुण वर्गाला शिक्षणाची आवश्यक गरज असते त्या ठिकाणी दारू चे दुकानें प्रशासनाने तसेच संबंधित विभागाने देने योग्य आहे का हा प्रश्न जनसामान्य लोकांना पडला आहे?

पेशाने शिक्षक असलेल्या वैशाली संजय तुमराम ह्या छोटुभाई पटेल हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
ह्या बियर शॉपी चे लायसन्स क्रमांक 72 हे ह्यांचाच नावाने नोंदणी कृत आहे. शिक्षणाचे विध्यार्थाना धडे देताना बियर शॉपी चे वैध लायसन्स घेणे गैर नाही?
मात्र कुठेतरी या महाविद्यालय तरुण वर्गाला या बियर शॉपी च्या आहारी होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यावर कठोर कारवाई करत या बियर शॉपी ला टाळे ठोकण्याची गरज वास्तविकता मध्ये आवश्यक झाली आहे?

नेमके पाणी कुठे मुरले हा संशोधनाचा विषय जरी असला मात्र नियमाला कसे काय डावलत या दारू दुकानाला परवाण्या साठी कुणाचा हाथभार लागला हे महत्वाचे आहे!

वैशाली संजय तुमराम यांचे पती श्री संजय तुमराम हे राज्यातील प्रसिद्ध असलेल्या साम टीवी या वृत्तवाहिनीस चंद्रपूर प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील धुरा सांबळतात त्यांनी जिल्ह्यातील अनेक अवैध व्यवसायाचे पायेमुळे खोदत समाजातील अनेक समस्याना आपल्या चॅनेल च्या माध्यमातून बातमी प्रकाशित करत मोठी वाचा फोडली आहे.?
समाजकारण असो की राजकारण त्यांच्या अचूक बातम्या महाराष्ट्रातील जनतेने उत्कृष्ट पद्धत्तीने पाहल्या आहे. त्यांची कामाची पद्धत अत्यंत बारीक असून नियमात बसेल इतकेच ते काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी श्रमिक पत्रकार संघ चे अध्यक्ष याचेही पद भूषवले आहे.
दारू बंदी च्या काळात अनेक अवैध दारू व्यवसायातील त्यांनी विशेष रूपाच्या बातम्या प्रकाशित करत प्रशासनाला जागवले होते?
सध्या हल्ली पत्रकारिते सोबत त्यांचा जोड धंधा म्हणून दारू चे दुकान असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे? ते स्वतः या बियर शॉपी ला सध्या ऑपरेट करत असून ते व्यवसाय चालवीत असल्याची माहिती मिळाली आहे. पत्रकार असल्याने त्यांची समाजात चांगलीच ओळख आहे?
तसेच अधिकारी वर्ग आणि राजकारणा तील दिग्गज मंडळी यांच्या सोबत असणारी ओळख मुळे तर यांच्या बियर शॉपी ला वरदान तर नाही! हा मोठा प्रश्न सध्या सामान्य नागरिकांना पडला आहे?
लवकरच या संदर्भात एका जवाबदार नागरिकांकडून बियर शॉपी बंद करण्या संधर्भात तक्रार करण्यात येणार असल्याची डेली पोस्ट मार्टम ला विश्वासनीय सूत्रा कडून माहिती मिळाली आहे.