चंद्रपूर (2एप्रिल)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांनी आज पहाटे तीन वाजता देशी – विदेशी दारू चा मोठा साठा पकडत दोन आरोपीना अटक केली आहे.बल्लारपूर रेल्वे परिसरात पोलिसांनी एस एस पॉईंट उभारला आहे.रेल्वे नी येणाऱ्या जाणाऱ्या संशयी व्यक्ती ची विचारपूस आणि चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे. रेल्वे ने बल्लारपूर येथील दारू साठा घेऊन जाणाऱ्या दोन व्यक्तींवर संशय बळवतास त्यांना ताब्यात घेत दुचाकी वर वी. आय. पी बॅग ची झडती घेतली असता तेलंगणा जातं असलेला दारू साठा पकडण्यात आला आहे.महाराष्ट्र येथील देशी दारूची तेलंगण्यात मोठी मागणी असून त्या ठिकाणी बल्लारपूर येथून तस्करी करणाऱ्या दोन व्यक्तीवर बल्लारशाह पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर ची कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा यांच्या नेतृवात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काक्रेडवर,पोलीस हवालदार संतोष दांडेवार, गणेश पुरळकर याच्या चमुने केली आहे.