पप्पू देशमुख यांना आमसभेत जाण्यापासून रोखण्याचा कट रचला

176

चंद्रपूर :(३१ ऑगस्ट ) सुनील तायडे

शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांची महापौर व आयुक्त यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

चंद्रपूर: मंगळवारी दुपारी होऊ घातलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आमसभेत सहभागी होण्याकरिता सभागृहामध्ये प्रवेश देण्यास मज्जाव केल्याच्या विरोधात, शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू महापौर व आयुक्त यांच्याविरोधात चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

आज दिनांक 31.8.2021 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहामध्ये मासिक सर्वसाधारण सभेचे (आमसभेचे) आयोजन करण्यात आले होते.कोरोना आपत्तीमुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात येते.मात्र महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षाचे गटनेते तसेच विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना या आमसभेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा आहे.अशाप्रकारची मुभा देणारे लेखी पत्र आमसभेच्या अजेंडा सोबत सर्व पदाधिकारी व गट नेत्यांना देण्यात येते.
मात्र आजच्या आमसभेत उपस्थित राहण्यासाठी दुपारी 12.50 वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आलेलो असताना प्रवेशद्वाराला आत मधून कुलूप लावलेले होते.तसेच तिथे उपस्थित पोलीस व मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला आत मध्ये जाण्यापासून रोखले.महापौर राखी कंचर्लावार तसेच आयुक्त राजेश मोहिते यांनी आपणांस आत मध्ये घेण्यात येऊ नये अशा प्रकारचे आदेश दिल्याचे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी देशमुख यांना सांगितले.तसेच कुलूप उघडण्याची वारंवार विनंती करूनही कर्मचाऱ्यांनी दरवाजाचे कुलूप उघडले नाही.असा शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांचा आरोप आहे. यानंतर देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दुपारी 1.30 च्या सुमारास महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार केली.
आपण आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे पुराव्यानिशी उघड केले.आजच्या आमसभेत करोडो रुपयांच्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा पुराव्यानिशी उघडकीस आणणार होतो. ही बाब काही अधिकाऱ्यांच्या मार्फत महापौर व आयुक्त यांना माहितीस आली व त्यामुळे त्यांनी कटकारस्थान रचून आपल्याला आमसभेत येण्यापासून म रोखले असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.तशा प्रकारची तक्रार करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंभोरे यांच्याकडे केलेली आहे.या तक्रारीची दखल घेऊन उचित कारवाई न झाल्यास मनपातील भ्रष्टाचार व दडपशाहीविरुद्ध जनआंदोलन पुकारण्याचा इशारा सुद्धा देशमुख यांनी दिला.