पॅसिफिक बार अँड रेस्टॉरंट वर DYSP ची धाड ‼️

1439

चंद्रपूर 31मार्च – नियमांची पायमल्ली करत, दारू दुकाने पहाटे पासून उघडणाऱ्या पॅसिफिक बार अँड रेस्टॉरंट वर स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी कारवाई केल्याचे आताचे वृत्त हाती आले आहे. बंगाली कॅम्प रोड ला रामनगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत चालणाऱ्या या बार ची गेल्या काही दिवसापासून चांगलीच मॉर्निंग बार चर्चा रंगू लागली होती.पॅसिफिक बार चे संचालक बबलू सलूजा असून रामनगर आणि बंगाली कॅम्प पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असताना राजरोसपने कुठल्या आशीर्वादाने हे मॉर्निंग बार सुरु होते हे विशेष!दारू उत्पादन शुल्क विभाग निद्रा अवस्थेत आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे? अजूनही काही मॉर्निंग बार पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव हे स्वतः घटना स्तळावर हजर असून कारवाई करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.