चंद्रपूर 27मार्च –
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस तर्फे प्रतिभा धानोरकर यांनी आपले शक्ती प्रदर्शन दाखवत असंख्य गर्दीने लाभलेल्या सभेत धूम्मचक्र वादळ निर्माण करत एका ढाण्या वाघाच्या वाघीनेने दहाड फुंकली असल्याच आज या सभेत पाहायला मिळाले आहे.
भाजप तर्फे सुधीर मुंगटीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्या नंतर आज पहिल्यांदाच काँग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला धारेवर धरत जबरदस्ती लग्नाच्या बाशिंग्यात बांधलेला बाहुला म्हणत चांगलाच खरपूस समाचार घेतला. लोकसभा उमेदवारी भेटल्यानंतर आपली काय अवस्था होणार याची भीती बाळगलेल्या चेहऱ्यावर बारा वाजलेल्या भाजपा च्या सुधीर मुनगंटीवार यांना आज च्या विराट सभेने झोप न येता, ते कळवट बदलवत राहील याची सभा स्थळी प्रतिभा धानोरकर यांनी गर्जना केली ?
मी रडायला नाहीतर लढायला आली आहे असे म्हणत गेल्या नव महिन्यापासून चंद्रपूर -वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. मतदारांचे आणि जिल्ह्यातील समस्याचे निराकरण करण्याकरिता मी लढत आहे, अश्रू आणि सहानुभूती वर निवडणूक जिंकता येत नाही यावर बोलणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला जर एका विधवा महिलेच्या अश्रू चे जर मोल समजत नसेल तर ते स्वयंभु विकासपुरुष कसले मी अश्रू आणि सहानुभूती वर नाहीतर खऱ्या लढवैय्या,नेतृव उभा करण्याची क्षमता ठेवणारी महिला म्हणत आक्रमक पवित्रा प्रतिभा धानोरकर यांचा आज भरसभेत पाहायला मिळाला असल्याचे दिसलें.हजारो च्या उपस्थित सख्येने आज या गर्दीने लक्ष वेधून घेतले होते.