दिनांक 30 ऑगस्ट ( सुशांत घाटे )
ठाणे जिल्ह्यातील कल्याण चे तहसीलदार दीपक आकडे व लिपिक मनोहर हरड यांना 1 लाख 20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत पथकाच्या चमूने रंगेहात पकडले. तहसीलदार हे भाजपाच्या आमदारांचे जावई असल्याची चर्चा आहे. संपूर्ण तहसील कार्यालयाला पोलिसांचा गराडा असून सर्व अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून व पोबारा केला असून लाच लुचपत विभागाची कारवाई सुरू आहे.