चंद्रपूर – अवैध दारूच्या मुसक्या आवळण्याच्या आदेशाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन चा चांगलाच धक्का जिल्ह्यातील अवैध दारुविक्रीला बसला आहे. लोहारा ते बल्लारपूर चा परवाना असणाऱ्या देशी दारू च्या 150पेट्या आडमार्गाने नेणाऱ्या महिंद्रा पिकप वाहणाला बल्लारपूर चे ठाणेदार आसिफराजा शेख आणी त्यांच्या चमुने विसापूर च्या आत जाताना पकडले. तब्बल 15लाखाच्या जवळपास मुद्धे्मालासह दुसरी मोठी कारवाई बल्लारपूर पोलिसांनी केली आहे. या आधी बल्लारपूर येथूनच 82पेट्या पकडल्या होत्या त्यानंतर आज मोठा देशी दारूचा साठा पोलिसांनी पकडला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या पोलीस कारवाई चे काम उल्लेखनीय आहे. मात्र जिल्ह्यातील ज्यांच्यावर अवैध दारू बंदीला रोकण्याचे काम आहे असे दारू उत्पादन शुल्क विभाग झोपेत आहे का? हा प्रश्न सध्या चर्चेचा ठरला आहे. सतत होत असलेल्या कारवाई ने दारू तस्कर ही पोलीस अधीक्षक यांच्या कारवाई ने दहशतीत आले आहे.
Home Breaking News बल्लारपूर पोलिसांचा तडका?150अवैध देशी दारू च्या पेट्या पकडल्या ‼️दुसरी मोठी कारवाई..