चंद्रपूर – लाच लुचपत विभागाचा तिसरा ट्रॅप हा महानगर पालिका च्या झोन एक मधील लिपिकावर पडला आहे.15हजार रुपयाची लाच घेताना लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले आहे. याच हफ्त्या मध्ये एकाच दिवशी दोन ट्रॅप चा दणका देणाऱ्या ACB ने तिसरा यशस्वी दणका भराष्ट्राचाराला दिला आहे.फारुख अहमद मुश्ताक अहमद शेख असे आरोपीचे नाव असून ते संजय गांधी मार्केट येथील महानगर पालिका झोन एक मध्ये लिपिक या पदावर कार्यरत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्या भरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भराष्ट्राचाराला आळा घालण्या करीता ग्रामीण भागासह शहरी परिसरातील भ्रष्टाचार ला पांगवण्यासाठी तक्रारीचे आव्हान केले होते. सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शना खाली,ACB च्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृवांत पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सहाय्यक फौजदार रमेश दुपारे, पोलीस हवालदार अरुण हटवार,रोशन चांदेकर, संदेश वाघमारे,नरेश नन्नावरे, राज नेवारे आणी त्यांच्या टीमने केली आहे.