पाच हत्याने जिल्हा हादरला… अवघ्या पंधरा दिवसात एका पाठोपाठ हत्या ने खळबळी?
चंद्रपूर 21 फरवरी – हत्येच्या सत्रा ने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ माजवली आहे. दर दोन तीन दिवसा आड हत्येची वार्ता ऐकावंयास मिळत आहे.एक दोन नाहीतर पंधरा दिवसात तब्बल पाच हत्ये ने खळबळ माजवून दिली आहे. या पाच हत्येतील अजूनही काही आरोपी च्या मागावर असणाऱ्या पोलीस खात्यातील अधिकारी आरोपीचा शोध घेत आहे. त्यातच आणखी आज झालेल्या कोरपना तालुक्यातील लोणी गावातील हत्येने पोलीस प्रशासन सुद्धा वैतागून गेले आहे. नवीन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार घेताच ब्रम्हपुरी, बल्लारपूर, गोंडपिपरी, चंद्रपूर आणी कोरपना येथे सतत दोन तीन दिवसाआड या हत्या झालेल्या आहे. अद्यापही या झालेल्या हत्येतील आरोपी पसार आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा दिवस रात्र वेगवेगळ्या राज्यात या आरोपीचा शोध घेत असताना मात्र हत्येच सत्र सुरु असल्याने पोलिसांची सुद्धा डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात क्राईम ग्राफ कमी व्हावा यासाठी पोलीस प्रशासन कारवाई करीत असताना मात्र जिल्ह्यातील होत असलेल्या हत्या ने पोलिसांची चांगलीच झोप उडाली आहे.येणाऱ्या काळात लोकसभा च्या निवडनुकी जवळ असताना आणखी किती ताण पोलीस प्रशासन वर राहील याची वेळ हे येणारा काळच ठरवेल!मात्र आज झालेल्या हत्ये मध्ये मुलाने थेट कुराडीने आई वडीलास संपवन्याचा डाव आखला त्यात आई ही त्या हल्यात मृत पावली तर वडील गंभीर जखमी आहे. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.