जिल्हा प्रशासनाला सापडेना रेती घाटाचा शुभ मुहूर्त ‼️‼️

571

जिल्हा प्रशासनाला सापडेना रेती घाटाचा शुभ मुहूर्त ‼️

रेती न मिळत असल्याने वाढवली सर्वसामान्य जनतेची झोप?

रेती घाटाचे लिलाव लांबवनी वर का?
जिल्हाधिकारी केव्हा घेतील निर्णय…..

चंद्रपूर -18 फरवरी –
जिल्हा प्रशासनाला सर्वसामान्य जनतेचा भुरळ पडल्याचा प्रत्यय पाहवयास मिळत आहे. जिल्ह्यात रेतीची टंचाई भासत असून नागरिकांचे, व्यावसायिक लोकांचे तसेच हॉटेल व्यवसायिकांचे आणी त्या सोबत छोटया मोठ्या उद्योगातील कितीतरी बांधकाम कामे रखडून पडल्याने मोठे नुकसान होऊ लागले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेसह कामगार वर्गालाही बसला आहे. जिल्हा प्रशासन ला घाट लिलावाचा अजून कोणता समिती चा अहवाल तसेच घाट विक्रीचा शुभ मुहूर्त भेटत नसेल तर तो पर्यंत स्वतः जिल्हा प्रशासनाने रेती ची उपलब्धता करून द्यावी. ज्या प्रमाणे शासकीय कामाच्या बांधकामला ला मान्यता देऊन रेती उपलब्ध करून दिल्या जाते त्याच प्रमाणे सर्व सामान्य जनतेला जिल्हाधिकारी महोदय नी रेती उपलब्ध करून द्यावी ही मागणी नागरिकां कडून होऊ लागली आहे.


अति आवश्यक बांधकाम चे चटके सर्वसामान्य जनतेला लागत असून रेती तस्कराकडून अव्वा च्या सव्वा भावात रेती खरेदी करण्यात येत असल्याने जनतेची मोठी आर्थिक लूट होत आहे.
रेती घाट संधर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा हे केव्हा निर्णय घेतील व हा मार्ग केव्हा मोकळा करतील या करीता रेती घाट धारक भी वाट बघित आहे. रोज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा घालू घालू रेती घाट धारक भी त्रस्त झाले आहे. कुठली समिती, कुठला अहवाल अद्याप टेबल वर पोहचायला का वेळ लागत आहे आणी अधिकारी वर्ग काय उशीर करत हे काही महसूल विभागा कडून उत्तर मिळेनासे झाले आहे. जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव ला अधिकाऱ्यां कडे सध्या मोठया प्रमाणात वेळ असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला उत्तर करून द्या म्हणजे झाले. जिल्ह्यात जवळपास 65 रेती घाट लीलावच्या प्रीतीक्षेत आहे. बांधकाम बंद पडल्याने कामगार वर्गात रोजनदारी करणाऱ्या वरतीही मोठी गदा आली आहे. हाथाला कामच नसेल तर खायचे काय हा प्रश्न त्यांना पडला आहे.