एकाच दिवशी लाच लुचपत विभागाचे दोन दणके!!
ब्रम्हपुरी आणी वीरूर मध्ये लोकसेवकास लाच घेताना दबोचले…..
चंद्रपूर – एकाच दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)जिल्ह्यात दोन ठिकाणी ट्रॅप केल्याने जिल्ह्यातील पोखरलेली ग्रामीण भागातील भ्रस्टाचार चवाट्यावर आला आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील ग्रामसेवकला 15000रुपयाच्या तडजोडी अंती 10000रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्या ग्रामसेवकच्या मुसक्या आवळल्या आहे. तर दुसरी घटनेने मध्ये राजुरा तालुक्यातील वीरूर येथील लोकसेवकास शेतकऱ्यांना थ्री फेस लाईन वरून लाचेची मागणी करणाऱ्यास 5000रुपयाची लाच घेताना अटक केली आहे.पहिल्या ट्रॅप मध्ये पुरोशात्तम टेम्भूरणे ग्रामसेवक झिलबोडी तालुका ब्रम्हपुरी तर दुसऱ्या ट्रॅप मध्ये शालिक देवराव चांदेकर वरिष्ठ तंत्रन्द्य (DC)यांस अटक करण्यात आलेली आहे. गेल्या तीन महिन्या पासून लाच लुचपत विभागाचे काही ट्रॅप हे थोड्या अंतराने हुकले होते मात्र शेवटी एकाच दिवशी लाच लुचपत विभागाने दोन ट्रॅप करून खळबळ माजवलेली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात लाचलूचपत प्रतिबंधक (ACB)विभाग अजूनही पोलीस, महसूल आणखी काही विभागावर करडी नजर टाकून आहे.
जिल्ह्यात भ्रस्टाचाराला आळा घालण्याचा प्रामाणिक प्रयन्त करण्याकरिता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक मंजूषा भोसले सतत कार्यान्वित आहे. आजच्या दोन्ही कारवाई ने जिल्ह्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने भ्रस्टाचार च्या चांगल्याच मुसक्या आवळल्याने भ्रस्टाचार करणाऱ्या च्या मनात चांगलीच धडकी भरली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, (ACB), संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्ग दर्शना खालील , मंजुषा भोसले, पोलीस उप अधीक्षक (Dysp Acb)चंद्रपूर पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, प्रशांत पाटील व त्यांच्या टीम ने ही कारवाई केलेली आहे.